नशीब असावं तर असं! एकाच कुटुंबातील तिघांना लागली 41-41 लाखांची लॉटरी; जाणून घ्या नेमकं काय घडलं 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 09:38 PM2022-10-28T21:38:40+5:302022-10-28T21:39:44+5:30

अमेरिकेतील मेरीलँड येथे राहणाऱ्या एका कुटुंबातील तीन सदस्यांनी समान क्रमांक असलेली लॉटरीची तिकिटे विकत घेतली. विशेष म्हणजे, या तिघांनाही 50,000 डॉलरचे (जवळपास 41 लाख रुपये) बक्षीस मिळाले.

Three of the same family won a lottery of 41 lakhs each; know about what really happened | नशीब असावं तर असं! एकाच कुटुंबातील तिघांना लागली 41-41 लाखांची लॉटरी; जाणून घ्या नेमकं काय घडलं 

नशीब असावं तर असं! एकाच कुटुंबातील तिघांना लागली 41-41 लाखांची लॉटरी; जाणून घ्या नेमकं काय घडलं 

googlenewsNext

नशिब काय चीज असते, हे बघायचे असेल, तर एकदा लॉटरीच्या जगात डोकावून पाहा. येथे कुठल्याही क्षणी लोकांचे नशीब बदलते. येथे गरीब लोक श्रीमंत होतात. तर श्रीमंत लोक आणखी श्रीमंत होतात. खरे तर, भारतातील अनेक राज्यांमध्ये लॉटरीवर बंदी आहे. मात्र, अमेरिका आणि ब्रिटनमधील लोक लॉटरीच्या माध्यमाने आपले नशीब आजमावताना दिसतात. याचेच एक उदाहरण म्हणजे अमेरिकेतील एक कुटुंब. या कुटुंबातील एक, दोन नाही, तर तब्बल तीन जणांनी 41-41 लाख रुपयांचे बक्षीस जिंकले आहे.

अमेरिकेतील मेरीलँड येथे राहणाऱ्या एका कुटुंबातील तीन सदस्यांनी समान क्रमांक असलेली लॉटरीची तिकिटे विकत घेतली. विशेष म्हणजे, या तिघांनाही 50,000 डॉलरचे (जवळपास 41 लाख रुपये) बक्षीस मिळाले. संबंधित अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कुटुंबाने 13 ऑक्टोबरच्या पिक 5 ड्रॉसाठी 5-3-8-3-4 गुण वापरले आणि ते विजेते ठरले.

1 डॉलरमध्ये खरेदी केलं तिकीट -
मेरीलँड लॉटरीनुसार, एका 61 वर्षीय व्यक्तीने हॅम्पस्टेडमध्ये 1 डॉलरमध्ये  टिकट खरेदी केले. यानंतर त्याची 28 वर्षीय मुलगी आणि 31 वर्षांच्या मुलाने एकाच दुकानातून एकाच ड्रॉसाठी तिकीट खरेदी केले. या सर्वच्या सर्व तीनही तिकिटांमध्ये विजेता क्रमांक 5-3-8-3-4 हा होता आणि  सर्वांनाच 50,000 डॉलरचे रोख बक्षीस मिळाले. 

नशीब चमकलं - 
लॉटरी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विजेत्यांपैकी एकाने जिंकलेल्या पैशांतून घर खरेदीची करण्याचे ठरवले आहे. तर, इतर दोन लोक जिंकलेल्या पैशांची गुंतवणूक करणार आहेत.

Web Title: Three of the same family won a lottery of 41 lakhs each; know about what really happened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.