तीन आजोबांची फ्री स्टाईल मारामारी पाहिली का? एवढी दुष्मनी की एकमेकाला केली बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 01:21 PM2021-09-14T13:21:46+5:302021-09-14T16:56:56+5:30

एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल होतोय. तो पाहताच तुम्हाला प्रश्न पडेल की या व्हिडिओमधले तीन वृद्ध नेमके वृद्ध आहेत की शाळेतली दंगाखोर मुलं. ते तीघही एकमेकांमध्ये असे भिडलेयत की तुम्ही म्हणाल यांना आवरा. त्यांच्यातील मारामारीचा हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय.

three old people fighting with each other video goes viral on social media | तीन आजोबांची फ्री स्टाईल मारामारी पाहिली का? एवढी दुष्मनी की एकमेकाला केली बेदम मारहाण

तीन आजोबांची फ्री स्टाईल मारामारी पाहिली का? एवढी दुष्मनी की एकमेकाला केली बेदम मारहाण

googlenewsNext

इंग्लिशमध्ये असं म्हणतात की एज इज जस्ट नंबर (age is just a number) याचा अर्थ वय काहीही असो तुम्ही जर ठरवलं तर तुमचं तारुण्य टिकवून ठेऊ शकता. या वाक्याची प्रचिती देणारा व्हिडिओ समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल होतोय. तो पाहताच तुम्हाला प्रश्न पडेल की या व्हिडिओमधले तीन वृद्ध नेमके वृद्ध आहेत की शाळेतली दंगाखोर मुलं. ते तीघही एकमेकांमध्ये असे भिडलेयत की तुम्ही म्हणाल यांना आवरा. त्यांच्यातील मारामारीचा हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय.

या व्हडिओमध्ये तुम्ही पाहु शकता की तीन वृद्ध कसे एकमेकांशी मारामारी करतायत. एक दुसऱ्याला दे दणादण चोपतायत. उताणे पडले तरी परत उठतायत अन् एकामेकाला कानशिलात वाजवतायत. हे तिघे एकमेकांवर असे तुटुन पडलेयत जसे जन्मोजन्मीचे वैरी आहे. एकहीजण मागे हटायला तयार नाही. 

हा धम्माल व्हिडिओ आयपीएस ऑफिसर रुपिन शर्मा यांनी ट्वीटरवर शेअर केला आहे. 'बड़े बूढों की लड़ाई की झलक' असं मजेदार कॅप्शनही दिलंय. हा व्हिडिओ पाहुन लोकांनी कॉमेंट्सचा वर्षाव केलाय. एकानं कमेंट करत म्हटलंय की मला वाटलं लॉकडाऊनमध्ये WWE बंद झालं. तर दुसऱ्यानं म्हटलं तरुणपणातच मारामारी करायची होती. म्हातारं होईपर्यंत वाट का पाहिली? याशिवाय अनेक मजेदार कमेंट्स येत आहेत.

 

Web Title: three old people fighting with each other video goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.