VIDEO : धक्कादायक! पतंगीत अडकून हवेत उडाली ३ वर्षांची चिमुकली, लोकांनी असा वाचवला तिचा जीव!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 03:50 PM2020-08-31T15:50:11+5:302020-08-31T15:56:40+5:30

ही संपूर्ण घटना कॅमेरात कैद झाली हा व्हिडीओ व्हायरल झालाय. या लहान मुलीला घेऊन पतंग साधारण १०० फूट वर उडाली होती.

Three year old girl launched 100ft into the air after getting trapped in kite | VIDEO : धक्कादायक! पतंगीत अडकून हवेत उडाली ३ वर्षांची चिमुकली, लोकांनी असा वाचवला तिचा जीव!

VIDEO : धक्कादायक! पतंगीत अडकून हवेत उडाली ३ वर्षांची चिमुकली, लोकांनी असा वाचवला तिचा जीव!

googlenewsNext

ताइवानमध्ये एक मोठं पसंत फेस्टिव्हल होतं. या फेस्टिव्हलमधील एका धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. एक मोठी पतंग उडत होती, अचानक या पतंगीमध्ये एक ३ वर्षांची मुलगी अडकली. पतंग या मुलीली घेऊन उडाली आणि एकच गोंधळ उडाला. ही संपूर्ण घटना कॅमेरात कैद झाली हा व्हिडीओ व्हायरल झालाय. या लहान मुलीला घेऊन पतंग साधारण १०० फूट वर उडाली होती.

या घटनेचा व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल झाला आहे. यात तुम्ही बघू शकता की, ३ वर्षांची लहान मुलगी पतंगीला अडकलेली दिसते. असे सांगितले जात आहे की, हा व्हिडीओ उत्तर तायवानमधील आहे. जशी लोकांना मुलगी पतंगीसोबत हवेत उडताना दिसली खालच्या लोकांनी तिला लगेच पकडले. पतंगही काही लोकांनी खेचली. सुदैवाने यात मुलीचा जीव वाचला. तिला काही साधारण जखमा झाल्या आहे. 

या घटनेत चिमुकल्या मुलीचा जीवही जाऊ शकला असता. हवेचा वेग जास्त असल्या कारणाने पतंग तिला कुठे घेऊन गेली असती याचा काही अंदाज नाही. पण जास्त उशीर होण्याआधीच वेळेतच लोकांनी मुलीला धरले आणि तिचा जीव वाचवला. Hsinchu City च्या प्रशासनाने हे फेस्टिव्हल बंद केलं. आणि हेही सांगितले की, पुढच्या वेळपासून सुरक्षेची अधिक व्यवस्था करावी.

बापरे! एका क्षणात पडला कोट्यावधी रुपये खर्च करून उभारलेला पूल; पाहा थरारक फोटो

Video : तहानलेल्या मांजरीनं असं काही केलं....; 'आत्मनिर्भर' मनीमाऊचा व्हिडीओ व्हायरल

Video : तुमच्या डोळ्यासमोर लपलाय बिबट्या; हरिणांना नाही दिसला, बघा शोधून सापडतोय का?

Web Title: Three year old girl launched 100ft into the air after getting trapped in kite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.