Viral Video: धप्पा! चिमुकल्या वाघाने पाठीमागुन येऊन आईला केलं 'आऊट', वाघ मायलेकाच्या लपाछपीचा क्युट खेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 03:31 PM2022-02-18T15:31:53+5:302022-02-18T15:32:03+5:30

एक छोटा वाघ मागून येतो आणि वाघिणीला अतिशय गोंडस पद्धतीने धप्पा मारतो. हा गोड व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हसू येईल आणि छोट्याशा वाघाच्या प्रेमातही पडाल. अत्यंत गोड असा हा व्हिडिओ आहे. तो तुम्ही पुन्हा पुन्हा पाहाल. अनेकजण हा व्हिडिओ शेअर करत आहेत.

tiger and cub playing hide and seek cute video goes viral on internet | Viral Video: धप्पा! चिमुकल्या वाघाने पाठीमागुन येऊन आईला केलं 'आऊट', वाघ मायलेकाच्या लपाछपीचा क्युट खेळ

Viral Video: धप्पा! चिमुकल्या वाघाने पाठीमागुन येऊन आईला केलं 'आऊट', वाघ मायलेकाच्या लपाछपीचा क्युट खेळ

googlenewsNext

मुलांच्या खोडकरपणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या खोड्या इतक्या गोंडस (Cute) असतात, की त्या पाहून तुम्ही त्या निरागसतेच्या प्रेमात पडाल. हे केवळ आपल्या माणसांमध्येच नाही, तर प्राण्यांनाही लागू होते. आता असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये वाघाचा (Tiger) छोटासा बछडा (Calf) आपल्या आईसोबत लपाछपीचा (Hide And Seek) खेळ खेळताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये, एक छोटा वाघ मागून येतो आणि वाघिणीला अतिशय गोंडस पद्धतीने धप्पा मारतो. हा गोड व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हसू येईल आणि छोट्याशा वाघाच्या प्रेमातही पडाल. अत्यंत गोड असा हा व्हिडिओ आहे. तो तुम्ही पुन्हा पुन्हा पाहाल. अनेकजण हा व्हिडिओ शेअर करत आहेत.

व्हिडिओमध्ये पांढऱ्या वाघाचा बछडा त्याच्या आईसोबत मजामस्ती करताना दिसत आहे. चिमुकल्या वाघाचा हा खोडकरपणा पाहून तो वाघिणीशी लपाछपी खेळत असल्याचा भास होत आहे. आईचे दुसरीकडे लक्ष आहे हे पाहताच मग तो मागून तिच्यासमोर उडी मारतो आणि धप्पा मारतो. समोर उभी असलेली वाघीण त्याला घाबरते. मागून आपले लेकरू आले आहे हे ती नंतर पाहते. या वाघिणीच्या गोंडस बछड्याची स्टाइल लोकांच्या पसंतीस उतरली आहे.

‘…तर मला चप्पल मिळाली असती’
हा व्हिडिओ IAS प्रियंका शुक्ला यांनी त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे. ज्याला ४९ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यासोबतच यूझर्सकडून या व्हिडिओवर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. एका यूझरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिले, की मी अशा प्रकारे धप्पा दिला असता तर मला नक्कीच चप्पल मिळाली असती’. दुसऱ्या यूझरने लिहिले, ‘हे पाहून लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.’ याशिवाय इतर अनेक यूझर्सनी यावर मजेशीर कमेंट्स केल्या.

Web Title: tiger and cub playing hide and seek cute video goes viral on internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.