पर्यटक घेत होते वाघांच्या कळपाचे विलोभनीय दर्शन, इतक्यात झालं असं काही की...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 02:52 PM2022-06-13T14:52:37+5:302022-06-13T14:55:19+5:30

चक्क वाघांचा एक कळप जंगलातून फिरताना दिसत आहे (Streak of Tigers Walking Through Jungle). ताडोबात वाघांचा कळपच पर्यटकांच्या जिप्सीसमोरून जात असल्याचं व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

tiger herd seen in tadoba video goes viral on social media | पर्यटक घेत होते वाघांच्या कळपाचे विलोभनीय दर्शन, इतक्यात झालं असं काही की...

पर्यटक घेत होते वाघांच्या कळपाचे विलोभनीय दर्शन, इतक्यात झालं असं काही की...

Next

वाघ, सिंह, बिबट्या, चित्ता हे अतिशय भीतीदायक आणि घातक जंगली प्राणी आहेत. हे प्राणी समोर येताच भल्याभल्यांना घाम फुटतो. मात्र, अनेकांना या प्राण्यांना समोरून पाहण्याची फार इच्छा असते. याच कारणामुळे लोक प्राणीसंग्रहालयांना भेटी द्यायला जातात. बऱ्याचदा इथे असं काही दृश्य दिसतं, ज्याची आपण कल्पनाही केलेली नसते. सध्या वनविभागाच्या अधिकाऱ्याने ट्विटरवर असंच एक दुर्मिळ फुटेज शेअर केलं आहे. ज्यामध्ये चक्क वाघांचा एक कळप जंगलातून फिरताना दिसत आहे (Streak of Tigers Walking Through Jungle). ताडोबात वाघांचा कळपच पर्यटकांच्या जिप्सीसमोरून जात असल्याचं व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

IFS सुशांता नंदा यांनी हा व्हिडिओ (Viral Video) शेअर केला आणि कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, "इथे लक्षात घेण्यासारखी बाब ही आहे की, वाघिणीला सहसा दोन ते चारच पिल्लं असतात. पाच बछडे असणं असामान्य असतं आणि जरी असलीच तरी या सर्वांचं जगणं अतिशय दुर्मिळ आहे. शिकारी प्राण्यांची उच्च घनता हे दर्शवते की इथे मानवी प्रभाव कमी आहे."

व्हिडिओमध्ये, सहा वाघ जंगलातील मातीचा रस्ता ओलांडताना दिसत आहेत. तर जिप्सीमधील पर्यटक प्राण्यांचा हा व्हिडिओ शूट करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सुसांता नंदा यांनी आपल्या अधिकृट ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 24 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. तर हजारो लोकांनी लाईकही केला आहे.

व्हिडिओ नेटकऱ्यांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका ट्विटर यूजरने लिहिलं की, “ही डोळ्यांना आनंद देणारी मेजवानी आहे!” तर दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिलं की, “हे दृश्य अप्रतिम आहे”. याशिवायही अनेकांनी व्हिडिओवर निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Web Title: tiger herd seen in tadoba video goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.