Tiger Viral Video : अचानक गाडीजवळ आला वाघ; नंतर काय घडलं? पहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 07:31 PM2024-08-31T19:31:22+5:302024-08-31T19:33:45+5:30

Viral Video : सोशल मीडियावर रणथंबोर व्याघ्र प्रकल्पातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

Tiger Viral Video : Tiger came near Udi car; What happened later? Watch the video | Tiger Viral Video : अचानक गाडीजवळ आला वाघ; नंतर काय घडलं? पहा व्हिडीओ

Tiger Viral Video : अचानक गाडीजवळ आला वाघ; नंतर काय घडलं? पहा व्हिडीओ

Viral Video News : जंगलात असताना अचानक वाघ उडी मारून तुमच्यासमोर उभा राहिला, तर...? असेच काहीसे घडले आहे, रणथंबोर व्याघ्र प्रकल्पात! सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सफारी गाडीमध्ये लोक भिंतीपलिकडे असलेल्या वाघांच्या हालचाली बघत आहेत. पण, अचानक वाघ जवळ येऊन उभा राहिला. 

वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या रणथंबोर प्रकल्पाला असंख्य पर्यटक भेट देतात. सफारी गाड्यांमधून पर्यटक फिरतात. जवळून वाघ बघण्याच्या पर्यटक आनंद लुटतात. पण, अनेकदा वाघ पर्यटकांच्या जवळ आल्याचेही प्रकार घडतात. 

उडी घेऊन वाघ आला सफारी गाडीजवळ

खुल्या सफारी गाडीमध्ये लोक उभे आहेत. काही लोक मोबाईलमध्ये वाघाच्या हालचाली टिपण्याचा प्रयत्न करत आहेत. 

पण, अचानक गाड्या उभ्या असलेल्या कठड्यावर वाघ उडी मारतो. अचानक वाघ जीपजवळ आल्याने महिला आणि इतर पर्यटक ओरडायला लागतात. त्यामुळे वाघही दचकतो. 

मात्र, काही लोक ओरडणाऱ्यांना शांत करतात. त्यामुळे वाघ काही क्षण उभा राहतो आणि नंतर पुढे निघून जातो.


हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला असून, यूजर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. एकाने म्हटले आहे की, यातील काही लोक वाघाचे जेवण बनण्यासाठी पात्र आहेत. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, वाघाचे लक्ष कसे वेधून घ्यायचे हे महिलेला चांगले माहिती आहे. 

Web Title: Tiger Viral Video : Tiger came near Udi car; What happened later? Watch the video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.