VIDEO : अचानक समोर येऊन उभा राहिला वाघ, मग लोकांनी केला 'मुर्खपणा'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2021 12:06 PM2021-01-22T12:06:28+5:302021-01-22T12:06:42+5:30
हा व्हिडीओ आयएफएस सुशांता नंदाने शेअर केलाय. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'जेव्हा मनुष्यांचं डोकं चालत नाही तेव्हा ते केवळ तोंड चालवतात.
जंगली सफारी करण्याची आवड अनेकांना असते. पण जंगल सफारी करताना आपले काही नियम आणि कायदे असतात. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओतून बघायला मिळतं की, पर्यटक घाबरून काही मुर्खपणाही करून बसतात. सफारी दरम्यान एक वाघ अचानक लोकांच्या समोर आला आणि लोक घाबरून ओरडू लागले. तर काही लोक कॅमेरात फोटो काढू लागले. मात्र, तो वाघ समजदार निघाला ज्याने त्याच्या रागावर कंट्रोल ठेवला आणि कुणाला काही नुकसान न पोहोचवता तिथून निघून गेला.
Idiotitis...
— Susanta Nanda IFS (@susantananda3) January 21, 2021
When human brain shuts down & mouth keeps talking.
Appreciate the anger management of the tiger. But that can’t be guaranteed in future. pic.twitter.com/dSG3z37fa8
हा व्हिडीओ आयएफएस सुशांता नंदाने शेअर केलाय. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'जेव्हा मनुष्यांचं डोकं चालत नाही तेव्हा ते केवळ तोंड चालवतात. वाघाने ज्याप्रमाणे आपला राग कंट्रोल केला त्याचं कौतुक करायला हवं. पण भविष्यात याची गॅरन्टी नाही दिली जाऊ शकतं'. या व्हिडीओला आतापर्यंत ८ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज आणि हजाराच्या वर लाइक्स मिळाले आहेत. (VIDEO : आरारारा खतरनाक! दोन वाघांची फ्री-स्टाइल फाइट पाहून बसल्या जागी फुटेल तुम्हाला घाम....)
Ridiculous behaviour by the visitors. It is too dangerous.
— Pravat Kumar Mishra (@Pravatmisra) January 21, 2021
Humans look dumber , and tiger looks smarter and magnanimous here
— Mowgli_Ram (@RM_Says) January 21, 2021
यात तुम्ही बघू शकता की, एका वाघ अचानक जंगलातून निघून रस्त्याच्या किनाऱ्यावरील भींतीवर येऊन उभा राहतो. तिथेच पर्यटकांची जीप उभी असते. काही लोक हा अद्भुत नजारा कॅमेरात कैद करू लागतात तर काही लोक वाघाला इतक्या जवळून बघून ओरडू लागतात. सुदैवाने वाघ कुणालाही नुकसान पोहोचवत नाही.