VIDEO : आरारारा खतरनाक! दोन वाघांची फ्री-स्टाइल फाइट पाहून बसल्या जागी फुटेल तुम्हाला घाम....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 12:15 PM2021-01-20T12:15:22+5:302021-01-20T12:17:53+5:30

जंगल सफारी करताना पर्यटकांना दोन वाघांची खतरनाक लढाई लढाई बघायला मिळाली तर लोकांना नक्कीच घाम फुटला असेल.

Tigers territorial fight video shared by ifs watch | VIDEO : आरारारा खतरनाक! दोन वाघांची फ्री-स्टाइल फाइट पाहून बसल्या जागी फुटेल तुम्हाला घाम....

VIDEO : आरारारा खतरनाक! दोन वाघांची फ्री-स्टाइल फाइट पाहून बसल्या जागी फुटेल तुम्हाला घाम....

Next

जंगलातील प्राण्यांचे आपले नियम-कायदे असतात. हे नियम तोडणाऱ्यांना शिक्षाही मिळते. जशी या वाघाला एका दुसऱ्या वाघाकडून मिळाली. जंगलात वाघांमध्ये आपल्या परिसरावरून भांडण होणं एक सामान्य बाब आहे. अशीच जंगल सफारी करताना पर्यटकांना दोन वाघांची खतरनाक लढाई लढाई बघायला मिळाली तर लोकांना नक्कीच घाम फुटला असेल. इतकेच काय तर त्यांच्या हृदयाचे ठोकेही वाढले असतील. दोन वाघांमधील ही लढाई एकाने कॅमेरात कैद केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे.

हा व्हिडीओ आयएफएस परवीन कासवान यांनी शेअर केलाय. त्यांनी याच्या कॅप्शनला लिहिले की, 'वाघांची लढाई. केवळ भारतातून. एक शानदार नजारा'. आतापर्यंत या व्हिडीओला ९७ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत आणि ७.६ हजार लाइक्स मिळाले आहेत.

असे मानले जात आहे की, दोन वाघांमध्ये हे भांडण परिसरामुळे झालं आहे. जंगलात जास्तीत जास्त वाघांमधील भांडणं याच कारणामुळे होतात. याआधीही सोशल मीडियावर अशाप्रकारच्या भांडणांचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. हा व्हिडीओ पाहून जास्तीत जास्त लोकांनी हेच म्हटलं की, हा नजारा भीतीदायक आहे.

यात तुम्ही बघू शकता की, दोन वाघ एका ठराविक अंतरावर चालत आहे. सफारीसाठी आलेले पर्यटक दोघांना कॅमेरात कैद करत आहेत. अचानक एक वाघ दुसऱ्या वाघावर जोरदार हल्ला करतो. दोघेही जोरात डरकाळ्या फोडतात. नक्कीच त्यांच्या डरकाळ्यांनी पर्यटकांना घाम फुटला असेल. अखेर एक वाघ हार मानून जमिनीवर बसतो आणि दुसरा तेथून निघून जातो.

Web Title: Tigers territorial fight video shared by ifs watch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.