Optical Illusion: या फोटोमध्ये दडलाय जिराफ! पाहा तुम्हाला शोधता येतोय का?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 10:05 PM2022-06-23T22:05:01+5:302022-06-23T22:25:27+5:30

अशाच प्रकारचा दृष्टिभ्रम तयार करणारा एक फोटो @jack.sglt या टिक-टॉक (Tik-Tok) युजरनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. तो सतत युजर्सना त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून अशा प्रकारची आव्हानं देत असतो.

tiktok user shares optical illusion photo which challenge social media user to find Giraffe in the picture | Optical Illusion: या फोटोमध्ये दडलाय जिराफ! पाहा तुम्हाला शोधता येतोय का?

Optical Illusion: या फोटोमध्ये दडलाय जिराफ! पाहा तुम्हाला शोधता येतोय का?

googlenewsNext

ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion) अर्थात दृष्टिभ्रम तयार करणारी चित्रं मेंदूला चालना देतात. या चित्रातलं रहस्य उलगडणं खूप कठीण असतं. अशा चित्रांमध्ये इतर अनेक वस्तू, प्राणी, मानवी चेहरे यांच्या आकृती लपलेल्या असतात. त्या पाहून बघणाऱ्याचा गोंधळ उडतो. त्यासाठी बरेचदा एकाच रंगसंगतीचा, चित्राच्या डिझाईनचा किंवा पॅटर्नचा वापर केलेला असतो. अशा प्रकारचे फोटो किंवा चित्र ही मेंदूला खाद्य पुरवणारी असतात. अशाच प्रकारचा दृष्टिभ्रम तयार करणारा एक फोटो @jack.sglt या टिक-टॉक (Tik-Tok) युजरनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. तो सतत युजर्सना त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून अशा प्रकारची आव्हानं देत असतो.

या चित्रात हिरव्या रंगाच्या झाडा-पानांमध्ये जिराफ प्राण्याचं चित्र दडलेलं आहे. हिरवळीतला हा जिराफ ओळखता येणं (Spot A Giraffe In The Picture) म्हणजे एखादी गोष्ट शोधण्याच्या तुमच्या कौशल्यांना आव्हान देईल, असं युजरनं म्हटलंय. “तुमची नजर फोटोवरून फिरवल्यावर तुम्हाला त्यात जिराफाची आकृती दिसेल,” असंही त्यानं सांगितलं आहे.

आता या हिरवळीमध्ये जिराफाला शोधण्याचं कसब तुम्हाला जमतंय का ते पाहा. सुरुवातीला कदाचित हे खूपच अवघड वाटेल. पानांचे आणि झाडांचे केवळ आकार व पॅटर्न्स या चित्रात दिसतील. जिराफाचं चित्रं शोधणं शक्यच नाही असं तुम्हाला वाटेल. पण थांबा, युजरनं एक टिपही दिली आहे. या चित्रात असणाऱ्या दाट हिरवळीमध्ये जिराफाचे डोळे शोधण्याचा प्रयत्न करा, कदाचित जिराफाची आकृती तुम्हाला लगेच सापडू शकेल, असं हे चित्र तयार करणाऱ्या युजरनं म्हटलं आहे. हे जिराफ जर तुम्ही शोधलंत तर तुमची नजर उत्तम काम करते असं लक्षात येईल.

ऑप्टिकल इल्युजन्स अर्थात दृष्टिभ्रम तयार करणं हे तितकं सोपं नाही. तसंच ते सोडवणंही खूप अवघड असतं. मेंदूच्या विकासासाठी हा खूप चांगला सराव असतो. एखादी गोष्ट खरोखरच आहे की नाही, हे तपासणं मेंदूला अधिक सक्षम करतं. एखाद्या चित्रावरून नजर फिरवणं आणि काळजीपूर्वक पाहणं यातला फरक अशा प्रकारच्या चित्रांवरून स्पष्ट होतो. लहान मुलांसाठीही या एक्सरसाइजचा (Brain Exercise Images) फायदा होतो. यामुळे आकलनक्षमता विकसित होण्यास मदत होते. विचार करण्याची क्षमता वाढते. एखाद्या गोष्टीचा अर्थ लावण्याचं कौशल्य वाढतं. सोशल मीडियावर असे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. त्याला युझर्सचे खूप लाईक्स मिळतात.

सध्या हा सोशल मीडियातील ट्रेंड आहे ज्यात ऑप्टिकल इल्युजन असणारे फोटो, चित्र शेअर केले जाता आणि इतर सोशल मीडिया वापरकर्त्यांची परीक्षा पाहिली जाते.

Web Title: tiktok user shares optical illusion photo which challenge social media user to find Giraffe in the picture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.