केवळ एक रूपयात चमकदार होतील घरातील सीलिंग फॅन, लगेच करा 'हा' सोपा उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 12:05 PM2024-08-16T12:05:41+5:302024-08-16T12:09:37+5:30
Fan Cleaning Tips : किचनमधील धुरामुळे त्यावर थोडं तेलही जमा होतं आणि मग धूळ आणखी घट्टपणे फॅनवर जमा होते. ही धूळ काढणं फारच अवघड काम असतं. पण यावर एक सोपा उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Fan Cleaning Tips : अनेक लोकांना रोज घराची साफ-सफाई करणं आवडतं. वेगवेगळे सणवार असले की, लोक घराची स्वच्छता करतात. आता रक्षाबंधन आहे. अशात घरात पाहुणे येतात. मग घराची सफाई तर करावीच लागते. अनेकांच्या घरात सीलिंग फॅनवर खूपसारी धूळ जमा होत असते. किचनमधील धुरामुळे त्यावर थोडं तेलही जमा होतं आणि मग धूळ आणखी घट्टपणे फॅनवर जमा होते. ही धूळ काढणं फारच अवघड काम असतं. पण यावर एक सोपा उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
जर तुम्हीही नेहमीच घराची सफाई करत असाल तर सीलिंग फॅन स्वच्छ करणं विसरू नका. केवळ एक रूपया खर्च करून तुम्ही फॅनची स्वच्छता करू शकता. आज आम्ही फॅनवरील धूळ साफ करण्यासाठी एक सोपा उपाय सांगणार आहोत.
घरात कचरा न करता स्वच्छ करा फॅन
सगळ्यात आधी तर फॅनवरील धूळ साफ करा. जर स्वच्छता करताना घरात धूळ होत असेल तर खाली काहीतरी टाका. पेपर टाकू शकता. जेणेकरून धूळ जमिनीवर पडणार नाही.
एक रूपयाचं क्लींजर
फॅन केवळ पुसून चांगल्या पद्धतीने स्वच्छ होत नाहीत. त्यावर धुळीचे काळे डाग पडलेले असतात. ते काढायला खूप मेहनत घ्यावी लागते. हे डाग तुम्ही एक रूपयाच्या शाम्पूच्या पाऊचने दूर करू शकता. यासाठी एका भांड्यात शाम्पू टाका, अर्धा चमचा मोहरीचं तेल टाका आणि अर्धा ग्लास पाणी टाका. याचं चांगलं मिश्रण तयार करा.
यानंतर शाम्पूचा वापर करून तयार केलेल्या या मिश्रणाने तुम्ही फॅन स्वच्छ करण्यासाठी एका सूती कापड घ्या किंवा स्पंज घ्या. स्पंज मिश्रणात बुडवून एक एक करून फॅनचे ब्लेड स्वच्छ करा. २ ते ३ मिनिटे त्यांवर हे मिश्रण राहू द्या. नंतर सूती कापड हलका भिजवून फॅनचे ब्लेड साफ करा. याने फॅन चमकू लागेल.
कमी खर्चाची आणखी एक आयडिया
काहीच खर्च न करता तुम्हाला घरातील सीलिंग फॅन चमकवायचे असतील तर घरातील व्हाईट व्हिनेगर आणि डिशवॉश मिक्स करून एक मिश्रण तयार करा. त्यात थोडं पाणी टाका. स्पंजच्या मदतीने फॅनचे ब्लेड स्वच्छ करा. नंतर एक कापडाने ब्लेड पुसून घ्या. फॅन नवीन आणि चमकदार दिसू लागतील.