डस्टबिनमधून येणाऱ्या दुर्गंधीने झालात हैराण? या घरगुती उपायांनी लगेच दूर होईल समस्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 12:22 PM2024-10-10T12:22:13+5:302024-10-10T12:22:42+5:30
Dustbin Cleaning Tips : कचरा होऊ नये किंवा कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी लोक घरात डस्टबिन तर ठेवतात. पण त्याच्या स्वच्छतेकडे फारसं लक्ष देत नसतात.
Dustbin Cleaning Tips : आजकाल सगळ्याच घरांमध्ये डस्टबिनचा वापर केला जातो. घर काय किंवा ऑफिस काय सगळीकडे कचरा जमा करण्यासाठी डस्टबिनचा वापर केला जातो. अनेक घरांमध्ये प्रत्येक रूममध्ये डस्टबिन असतात. मात्र, अनेकदा या डस्टबिनमधून दुर्गंधी येऊ लागते. ही दुर्गंधी घरात सगळीकडे परसते.
कचरा होऊ नये किंवा कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी लोक घरात डस्टबिन तर ठेवतात. पण त्याच्या स्वच्छतेकडे फारसं लक्ष देत नसतात. त्यामुळे यातून दुर्गंधी येऊ लागते. दुर्गंधी कशामुळेही का येईना यामुळे घरातील वातावरण खराब होतं. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला डस्टबिनमधून येणारी दुर्गंधी दूर करण्याच्या काही सोप्या टिप्स सांगणार आहोत.
बेकिंग सोडा
बेकिंग सोड्याचा वापर वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जातो. वेगवेगळ्या गोष्टी साफ करण्यासाठीही बेकिंग सोड्याचा वापर केला जातो. डस्टबिनमधून येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठी देखील तुम्ही बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. यासाठी २ ते ३ चमचे बेकिंग सोडा डस्टबिनमध्ये टाका. त्यानंतर यात वरून टाका. जेव्हा डस्टबिन पूर्ण भरेल तेव्हा वरूनही बेकिंग सोडा टाका.
लिंबाची साल
डस्टबिनची दुर्गंधी दूर करण्यासाठी लिंबाची सालही खूप फायदेशीर ठरते. यासाठी पाण्यात लिंबाची साल टाकून उकडून घ्या. हे पाणी तुम्ही डस्टबिन स्वच्छ करण्यासाठी वापरू शकता. तसेच लिंबाची साल वाळवून ती डस्टबिनमध्ये खाली टाकून ठेवा. यानेही दुर्गंधी कमी होण्यास मदत मिळेल.
ब्लीच पावडर
ब्लीचिंग पावडरचा देखील वेगवेगळ्या क्लीनिंगमध्ये वापर केला जातो. यासाठी डस्टबिनमध्ये कचरा टाकण्याआधी थोडं ब्लीचिंग पावडर टाका. यामुळे डस्टबिनमधून दुर्गंधी येणं कमी होईल.
एसेंशिअल ऑईल
किचनच्या डस्टबिनमध्ये खराब, ओला आणि सुका कचरा मिक्स केल्याने फार जास्त दुर्गंधी येऊ लागते. अशात तुम्ही तुम्हाला हवा ते एसेंशिअल ऑईल वापरू शकता. रूईवर हे ऑईल लावून डस्टबिनच्या आत ठेवा. याने दुर्गंधी येणार नाही.