अशी धारधार करा घरातील कात्री! वाचा साध्या सोप्या टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2022 08:26 PM2022-07-28T20:26:22+5:302022-07-28T20:28:03+5:30

त्यासाठी आपल्याला हवे असल्यास आपण काही टिप्स वापरून घरीच कात्री धारदार करू (Tips and tricks to sharp scissors) शकता.

tips to sharpen your scissor | अशी धारधार करा घरातील कात्री! वाचा साध्या सोप्या टिप्स

अशी धारधार करा घरातील कात्री! वाचा साध्या सोप्या टिप्स

googlenewsNext

कात्री सर्रास सर्व घरांमध्ये वापरली जाते. कपडे कापण्यापासून ते घरातील छोट्या-छोट्या गोष्टी कापण्यापर्यंत लोकांचे हात आधी कात्रीकडे जातात. मात्र, काही दिवस वापरल्यानंतर कात्रीची धार कमी होते. त्यासाठी आपल्याला हवे असल्यास आपण काही टिप्स वापरून घरीच कात्री धारदार करू (Tips and tricks to sharp scissors) शकता.

वास्तविक, कात्रीची तीक्ष्ण धार कमी झाल्यानंतर आपली कामं नीट होत नाहीत. कात्री दुरुस्त करून घेण्यासाठी आपल्याला बाजारात जावे लागते किंवा नवीन विकत घेण्याचा खर्च वाढतो. काही घरगुती उपाय आहेत, ज्यामुळे या दोन्ही गोष्टी करण्याची गरज नाही. काही पद्धतींनी आपण घरी बसूनही कात्रीची धार दुरुस्त करू शकतो. जाणून घेऊया घरी कात्रीला कशी धार करायची.

पॉलिश पेपर वापरा -
कात्रीच्या काठाची धार सुधारण्यासाठी आपण पॉलिश पेपर वापरू शकता. पॉलिश पेपर बाजारात 5 ते 10 रुपयांना सहज मिळतो. पॉलिश पेपरने कात्री थोडा वेळ घासून घ्या. यामुळे आपली कात्री पूर्वीपेक्षा अधिक तीक्ष्ण होईल. तसेच कात्रीला धार आणण्यासाठी आपण कात्रीने पॉलिश पेपर देखील कापू शकता.

अ‍ॅल्युमिनियम फॉइल -
अ‍ॅल्युमिनियम फॉइल हे कात्री धारदार करण्याचा एक प्रभावी मार्ग ठरू शकतो. यासाठी थोडेसे अ‍ॅल्युमिनियम फॉइल घ्या आणि ते 8-10 वेळा चांगले फोल्ड करा. आता अ‍ॅल्युमिनियम फॉइल कात्रीने कापा, त्यामुळे कात्रीची धार चांगली होईल.

दगडावर घासणे -
कात्रीला धार लावण्यासाठी आपण दगडही वापरू शकतो. यासाठी मजबूत खडबडीत दगडावर कात्रीची धार असलेली बाजू घासावी. असे केल्याने कात्रीला काही वेळात चांगली धार येऊ लागते. मात्र, असं करताना कात्री घसरून तुमच्या हातात येऊ शकते. त्यामुळे दगडावर कात्री घासताना विशेष काळजी घ्यायला विसरू नका.

लोखंडावर घासणे -
कात्रीला धारदार करण्यासाठी लोखंडदेखील उपयोगी ठरू शकते. यासाठी लोखंड स्वच्छ करून उन्हात ठेवा. थोड्या वेळाने लोखंड गरम झाल्यानंतर त्यावर कात्री घासून घ्या. त्यामुळे कात्रीला चांगली धार येईल. पण, लोखंडावर कात्री घासताना ठिणग्याही उडू शकतात, हे लक्षात ठेवा. त्यामुळे सावधगिरीने लोखंडावर कात्री घासणे चांगले.

Web Title: tips to sharpen your scissor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.