युवा नेत्याची कमाल; अॅम्बूलन्स न मिळाल्यानं कोरोना रुग्णाला स्वतः बाईकवरून नेलं हॉस्पिटलमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 05:36 PM2020-08-13T17:36:43+5:302020-08-13T17:37:13+5:30
भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा हा 23 लाख 95,471 इतका झाला आहे आणि सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांत भारत तिसऱ्या स्थानी आहे.
भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा हा 23 लाख 95,471 इतका झाला आहे आणि सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांत भारत तिसऱ्या स्थानी आहे. भारतातील 16 लाख 95,860 रुग्ण बरे झाले असून 47,138 जणांना प्राण गमवावे लागले. या संकटकाळात देशातील अनेकांनी माणुसकी जपली आणि मोठ्या मनानं एकमेकांच्या मदतीसाठी हात पुढे केला. अशीच एक घटना समोर येत आहे. अनेक प्रयत्न करूनही कोरोना रुग्णाला हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी अॅम्बूलन्स मिळत नव्हती. यावेळी एका युवा नेत्यानं PPE किट घालून स्वतःच्या बाईकवरून त्या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये नेले. युवा नेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
JIO ग्राहकांना मोठा धक्का; IPL 2020चे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी करावी लागेल 'ही' गोष्ट!
पश्चिम बंगालच्या झारग्राम विभागातील तृणमुल काँग्रेसचा युवा नेता सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. येथे राहणाऱ्या एका व्यक्तिला कोरोनाची लक्षणं जाणवत होती. प्रयत्न करूनही त्याला अॅम्बूलन्स मिळाली नाही. तेव्हा तृणमुलच्या या युवा नेत्यानं रुग्णाला स्वतःच्या बाईकवर बसवून हॉस्पिटलमध्ये नेले. या दरम्यान त्यानं स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घेत PPE किट घातले.
गोपीबल्लपूर येथील ही घटना आहे. सत्यकाम पटनायत असे या युवा नेत्याचे नाव असून तो तृणमुल युवा मोर्चाचा अध्यक्ष आहे. काही दिवसांपूर्वी गावात आलेल्या व्यक्तीला ताप आल्याचे त्याला कार्यकर्त्यांकडून कळाले. 4-5 दिवसांपासून त्या व्यक्तीत कोरोनाची लक्षणं दिसत होती. पटनायक याने सांगितले की, अॅम्बूलन्ससाठी आम्ही बरेच प्रयत्न केले. पण, कोरोनाच्या भीतीमुळे कुणीच मदतीला पुढे आलं नाही. त्यामुळे या कुटुंबाला मदत करण्याचे मी ठरवले.''
IPL 2020: हिटमॅन रोहित शर्मा झालाय सज्ज, यूएईत खेळण्यासाठी बदलला 'लूक'; पाहा फोटो
पटनायकनं PPE किट खरेदी केले आणि ते परिधान करून रुग्णाच्या घरी पोहोचला. रुग्णाला स्वतःच्या बाईकवर बसवून तीन किलोमीटर लांब कोव्हिड केअर सेंटरमध्ये घेऊन गेला. डॉक्टरांनी रुग्णाला तपासून त्याला घरीच आयसोलेट होण्यास सांगितले.
पाहा व्हिडीओ...
Aft ambulances refused to shift man with fever to hospital fearing COVID-19,TMC youth leader Satyakam Patnaik wore a PPE, took suspected Covid patient to hospital in Jhargram district on own motorcycle.Appreciation poured in across political parties @fpjindiapic.twitter.com/8esMz8MR6z
— Prema Rajaram (@prema_rajaram) August 12, 2020
अन्य महत्त्वाच्या बातम्या
खरंच, 2021चा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप भारतात होणार? ICCनं तयार ठेवलाय बॅकअप प्लान!
IPL 2020 : मोठी बातमी; टीम इंडियाच्या त्रिशतकवीर फलंदाजाला झाला होता कोरोना
England vs Pakistan : फॅनसोबतच्या एका फोटोमुळे पाकिस्तानच्या संपूर्ण संघावर संकट?
विराट कोहलीचा फोटो असलेल्या जाहिरातीवर BCCIची कारवाई; जाणून घ्या नेमकं कारण
Video: वेटलिफ्टरनं उचललं 400 किलो वजन, अन्...; मन घट्ट करून पाहा थरार
England vs Pakistan, 2nd Test : 10 वर्ष, 8 महिने अन् 16 दिवसांनी खेळाडूला मिळाली पुनरागमनाची संधी
ट्वेंटी-20 लीग सुरू होण्यापूर्वी झाला राडा; शाहरुख खानच्या संघाला विशेष 'सूट'? अन्य फ्रँचायझी नाराज