'तो' सेल्फी बेतला जीवावर; नदीला उधाण आलं अन् तरुणी झाली गायब, अंगावर काटा आणणारा Video
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 01:59 PM2024-09-10T13:59:53+5:302024-09-10T14:06:22+5:30
पर्यटक अनेकदा नदीच्या काठावर सेल्फी घेतात आणि व्हिडीओ बनवतात, परंतु ही व्हायरल घटना पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल.
पर्यटक अनेकदा नदीच्या काठावर सेल्फी घेतात आणि व्हिडीओ बनवतात, परंतु ही व्हायरल घटना पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल. अंगावर काटा आणणारा एक व्हि़डीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये काही पर्यटक नदीच्या काठावर उभे राहून सेल्फी काढताना आणि व्हिडीओ बनवताना दिसत आहेत. याच दरम्यान, नदीला उधाण येतं आणि एक महिला वाहून जाते.
मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ चीनमधील कियानतांग नदीच्या किनाऱ्यावरचा आहे. यावर्षी आशियातील सर्वात शक्तिशाली वादळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुपर टायफून यागीने चीन, फिलिपाइन्स आणि व्हिएतनाममध्ये कहर केला आहे. याच दरम्यान, सेल्फी घेताना पर्यटक कियानतांग नदीच्या जोरदार प्रवाहात वाहून गेल्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
WARNING - disturbing (And I post this as a warning).
— Volcaholic 🌋 (@volcaholic1) September 8, 2024
Another video of people taking dangerous selfies. This is Qiantang River in China a couple of days ago....😳pic.twitter.com/0P5JhX2FTH
पर्यटक नदी किनारी फोटो आणि व्हिडीओ काढत होते. पण त्याचवेळी नदीला उधाण येतं आणि पाणी काठापर्यंत पोहोचतं. काठावर उभे असलेले पर्यटक पाणी येताच मागे येतात. पण एक महिला तिथेच उभी राहून सेल्फी काढत असते. असं करणं तिच्यासाठी जीवघेणं ठरलं आहे. कारण ती त्या नदीच्या जोरदार प्रवाहात वाहून गेली. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिलेला आहे.