बाबो! Fortuner कारमध्ये बनवलं टॉयलेट, आता गाडीतून खाली उतरण्याची पडणार नाही गरज, Video
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 04:52 PM2022-08-10T16:52:24+5:302022-08-10T16:58:23+5:30
Toyota Fortuner Modifications: पठ्ठ्यानं कार केली मॉडिफाय. सध्या या कारचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Toyota Fortuner with Built in Toilet: जेव्हा आपण दूरचा प्रवास करतो तेव्हा आपण मोठी तयारी करतो. लोक जेवणापासून ते राहण्यापर्यंत आणि झोपेपर्यंत सर्व व्यवस्था करतात. पण सर्वात मोठी समस्या शौचालयाची येते. पण जर तुमच्या गाडीत टॉयलेट शीट बसवली असेल तर? एका व्यक्तीने आपल्या टोयोटा फॉर्च्युनर कारमध्ये अशाप्रकारे बदल केले की त्यात टॉयलेट शीट बसवली. Revokid Vlogs नावाच्या YouTube चॅनलने हा व्हिडिओ अपलोड केला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.
बाहेरून पाहिलं तर ही कार सामान्य टोयोटा फॉर्च्युनरसारखी दिसते. परंतु सर्वात मोठा बदल तिच्या तिसऱ्या रो मध्ये दिसून येतो. SUV च्या तिसऱ्या रो मध्ये मोबाईल टॉयलेट देण्यात आले आहे. विशेष म्हणजे प्रसाधनगृहात पाण्याच्या सोयीसाठी मागील बाजूस खास टाकी देण्यात आली आहे.
टॉयलेटचा आकार इतका कॉम्पॅक्ट आहे आणि ते तिसऱ्या रांगेत फक्त एका सीटची जागा घेतो. त्याच्या शेजारील सीट आरामात बसण्यासाठी वापरता येते. म्हणजेच टॉयलेट बसवल्यानंतरही ही कार 6 सीटरच राहते.
सहसा तुम्ही कोणत्याही व्हॅनिटी व्हॅनमध्ये अशा प्रकारचे टॉयलेट पाहिले असेल. कॅम्पिंग करताना किंवा लांब पल्ल्याचा प्रवास करताना हे खूप उपयुक्त ठरू शकते. यूट्यूब व्हिडिओच्या वर्णनात असे म्हटले आहे की या टोयोटा फॉर्च्युनरमध्ये बदल करण्याचे काम OJES AUTOMOBILES ने केले आहे. हे टॉयलेट खास दिव्यांगांसाठी बसवण्यात आले आहे. कारचा उपयोग चॅरीटी कामांसाठी केला जातो. या प्रकारच्या मॉडिफिकेशनसाठी साधारणतः 70 हजार ते 1 लाख रुपये खर्च येतो.