ट्रॅक्टरमध्ये भूत शिरलं..? आपोआप सुरू झालं अन् दुकानात शिरलं, पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 04:03 PM2023-03-03T16:03:07+5:302023-03-03T16:03:39+5:30

तासभर ट्रॅक्टरमध्ये काहीच हालचाल नव्हती, मग अचानक सुरू झालं अन्...

tractor automatically started and entered in the shop, incident in Bijnaur UP, see the video | ट्रॅक्टरमध्ये भूत शिरलं..? आपोआप सुरू झालं अन् दुकानात शिरलं, पाहा Video

ट्रॅक्टरमध्ये भूत शिरलं..? आपोआप सुरू झालं अन् दुकानात शिरलं, पाहा Video

googlenewsNext


Tractor Viral Video: अनेकवेळा कॅमेऱ्यात असं काहीतरी रेकॉर्ड होतं, जे पाहून लोक विचारात पडतात. अशा घटनांवर स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्याशिवाय विश्वास बसत नाही. अशीच एक विचित्र घटना उत्तर प्रदेशातील बिजनौर बुटांच्या दुकानात घडली. तिथे पार्क केलेला एक ट्रॅक्टर चावीशिवाय अचानक सुरू झाला आणि थेट दुकानाची काच फोडून आत घुसला. दुकानातील सीसीटीव्हीमध्ये घटना रेकॉर्ड झाली. व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल की, या ट्रॅक्टरमध्ये भूत शिरलं का काय...

ट्रॅक्टर स्वतःहून कसा सुरू झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. दुकान मालकाच्या तक्रारीनंतर बिजनौर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. बिजनौर कोतवाली शहर पोलीस ठाण्यासमोरच ही विचित्र घटना घडलीये. मिळालेल्या माहितीनुसार, किशन कुमार यांनी त्यांचा ट्रॅक्टर चपलांच्या दुकानासमो उभा केला होता. ट्रॅक्टर तासभर तिथेच उभा राहिला आणि नंतर अचानक सुरू होऊन शोरुममध्ये घुसला. ड्रायव्हरशिवाय ट्रॅक्टर सुरू झाल्याचे पाहून दुकानातील कर्मचारीही चक्रावले.

ट्रॅक्टर दुकानात घुसताच कर्मचारी इकडे तिकडे धावू लागतात. पुढच्याच क्षणी दुकानाबाहेर 'भुताचा ट्रॅक्टर' पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमली. यामुळे लाखोंचे नुकसान झाल्याचे दुकान मालकाने सांगितले. तसेच, त्यांनी कारवाईची मागणी केली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, नेटकरी विविध प्रतिक्रियाही देत आहेत.

Web Title: tractor automatically started and entered in the shop, incident in Bijnaur UP, see the video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.