Bike Triple Seat Video: बाईकवरून ट्रिपल सीट जाणाऱ्यांना पोलिसांनी अडवलं, पुढे काय घडलं पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 06:18 PM2022-12-12T18:18:18+5:302022-12-12T18:19:57+5:30

पोलिसांना पाहताच बाईकस्वार गयावया करायला लागतो.

Traffic police caught biker with triple seat travelling apologizing video viral | Bike Triple Seat Video: बाईकवरून ट्रिपल सीट जाणाऱ्यांना पोलिसांनी अडवलं, पुढे काय घडलं पाहा...

Bike Triple Seat Video: बाईकवरून ट्रिपल सीट जाणाऱ्यांना पोलिसांनी अडवलं, पुढे काय घडलं पाहा...

googlenewsNext

Bike Triple Seat, Viral Video: रस्त्यावर जर कोणी ट्रिपल सीट बाईक चालवत असेल तर तो वाहतूक पोलिसांपासून दूरच राहतो. तीन लोक बसून दुचाकी चालवणे बेकायदेशीर आहे आणि वाहतूक पोलीस नियमांचे पालन न केल्याबद्दल त्यासाठी मोठा दंड आकारू शकतात. इतकेच नव्हे तर वाहतूक पोलीस आणखी कठोर पावलेही उचलू शकतात. तसा त्यांना अधिकार देण्यात आला आहे. पोलीस सुरूवातीला लोकांना चेतावणी देतात, समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात, पण तरीही काही लोक ऐकत नाहीत. काही लोक नियम धाब्यावर बसवून प्रवास करतात आणि मग पोलीस त्यांना चांगलीच अद्दल घडवतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती आपल्या बाईकवर तीन लोकांना घेऊन जाताना दिसतो पण तितक्यात पोलीस त्याला पकडतात. त्यानंतर जी धमाल घडते ती या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक ड्रायव्हर गाडीवर बसलेल्या तीन जणांसह रस्त्याने जात असल्याचे दिसून येते. रस्त्यावर चेकिंग चालू असते. ट्रॅफिक पोलिसांना पाहून ट्रिपल सीट जाणारा बाईकस्वार एकाला पटकन खाली उतरायला सांगतो. पण चाणाक्ष पोलिसांच्या नजरेतून हा प्रकार सुटत नाही. तुम्ही तिघे होतात, अचानक जादू कशी झाली, तुमच्यातील एक जण कुठे गेला असा सवाल पोलीस मजेशीर पणे विचारतो आणि त्यानंतर अतिशय नीटसपणे त्यांना समजावून सांगतो. पाहा व्हिडीओ-

पोलीस त्या तिघांना पकडतात, त्यानंतर ते बाईकस्वाराला वेगळ्याच पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. पोलीस विचारतात की, तू बाईकवरून का उतरलास? यावर तिघेही म्हणतात की पोलीस मारहाण करतील म्हणून आम्ही एकाला उतरण्यास सांगितले. तेव्हा पोलीस म्हणतात की, 'अरे कोणी मारत नाही, पोलिसही मारत नाहीत. पण एक लक्षात ठेवा की बाईकवर दोनपेक्षा जास्त लोकांना बसण्याची परवानगी नाही. याचा दंड तर भरावा लागतो, १०००-२००० रूपयांची पावतीही फाडावी लागते. पण महत्त्वाचे म्हणजे दु्र्दैवाने अपघात झालाच तर त्याचे परिणाम तिघांनाही भोगावे लागू शकतात. त्यामुळे दंडाची भीती बाळगण्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे जीवाची काळजी करा, असा संदेश पोलीस त्या तिघांना देतात.

Web Title: Traffic police caught biker with triple seat travelling apologizing video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.