बाबो! नियम मोडल्याने पोलिसांनी फाडली लांबच लांब पावती, दंडाची रक्कम पाहून अवाक् व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2020 07:29 PM2020-11-02T19:29:12+5:302020-11-02T19:41:23+5:30
Viral News Marathi : वाहतुकीचे नियम मोडल्याने एका दुचाकीस्वाराला त्याच्या बाईकच्या किंमतीपेक्षाही जास्त दंड मोजावा लागला आहे.
नियम हे तर तोडण्यासाठीच असतात हे वाक्य अनेकदा तुमच्या कानी पडलं असेल. पण असाच एक हटके प्रकार समोर आला आहे. निष्काळजीपणामुळे एका दुचाकीस्वाराला चांगलाच फटका बसला आहे. या घटनेची चर्चा सध्या सर्वत्र सुरू असून सोशल मीडियावर ही घटना चांगलीच व्हायरल झाली आहे. वाहतुकीचे नियम मोडल्याने एका दुचाकीस्वाराला त्याच्या बाईकच्या किंमतीपेक्षाही जास्त दंड मोजावा लागला आहे.
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना बंगळुरूमध्ये घडली होती. हेल्मेट न घालता दुचाकी चालवणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं. जेव्हा पोलिसांनी त्याला स्कूटरच्या किंमतीपेक्षाही जास्त दंड वसूल करत चालान कापलं. वाहतुकीचे अनेक नियम मोडल्यामुळे हा दंड आकारण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अरूण कुमारने तब्बल 77 वेळा वाहतुकीचे नियम तोडले आहेत. म्हणून दंडाची रक्कम ही खूप जास्त आकारण्यात आली. पोलिसांनी आता अरूणची दुचाकी ताब्यात घेतली आहे.
काय सांगता? भिकारी महिलेच्या अकाऊंटमध्ये सापडले तब्बल दीड कोटी रुपये, अन् मग.....
शुक्रवारी दुचाकी चालवताना हेल्मेट न घातल्यामुळे पोलिसांनी या तरूणाला थांबवले. अरुण कुमार असं या व्यक्तिचे नाव आहे. पोलिसांनी जेव्हा त्याला 2 मीटर लांब चालानाची पावती हातामध्ये दिली तेव्हा तरुणाला दंडाची रक्कम पाहून धक्काच बसला. ही रक्कम तरुणाच्या बाईकच्या किंमतीपेक्षाही जास्त होती. तब्बल 42 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. अरुणने सांगितले की हा दंड त्याच्या सेकंड हँड स्कूटरच्या किंमतीपेक्षा जास्त आहे. सलाम! दिवसा नोकरी अन् रात्री सायकलवर फूड डिलिव्हरी करून स्वप्नांसाठी राबतोय हा इंजिनिअर