घरात खोदकाम करताना सापडला खजिना !मालकिणीने हिस्सा दिला नाही, मजूर पोहोचला कोर्टात...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 03:31 PM2023-04-18T15:31:07+5:302023-04-18T15:32:13+5:30
मजुराने हे प्रकरण न्यायालयात पोहोचले आहे.
आपल्याकडे जुन्या घरांची खुदाई सुरू असताना अनेक मौल्यवान वस्तु सापडतात. समजा तुमच्या घरात एखादा मजूर काम करत असेल आणि त्याला खोदताना काही खजिना सापडला तर त्या खजिन्यावर कोणाचा हक्क असेल. तुम्हाला वाटेल की ते तुमचेच असेल, पण ते मजूरही त्या खजिन्यामध्ये हिस्सा मागू लागले तर कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. सध्या सोशल मीडीयावर अशाच एका खजिन्याची चर्चा सुरू आहे. एका मजुराला खोदकाम करत असताना मोठा खजिना सापडतो. यानंतर त्याची मालकिन सर्व खजिना आपल्या ताब्यात घेते. यावरुन तो मजूर कोर्टात याचिका दाखल करतो. पुढ या प्रकरणावर अनेक सुनावण्या होतात.
मजुराला कोर्टात युक्तिवाद करताना म्हणाला, या पैशावर आपलाही अधिकार आहे कारण त्यावेळी तेथे कोणीही उपस्थित नव्हते. मला सर्वच पैसे हवे असते तर मी गुपचूप आपल्याकडे ठेवू शकलो असतो.
हे प्रकरण जुने आहे ते आता व्हायरल झाले आहे. नुकतेच हे प्रकरण सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. एका घरात मजूर काम करत होता आणि तो जुनी भिंत तोडून नवीन भिंत बांधण्याचे काम करत होता. त्याने भिंत तोडण्यास सुरुवात करताच त्यातून नोटांचे बंडल बाहेर येऊ लागले. त्यावेळी तेथे कोणीही उपस्थित नव्हते. त्याने संपूर्ण भिंत तोडली आणि त्यातून खूप मोठ्या प्रमाणात पैसा बाहेर आला.
भारतीय किमतीत सुमारे दीड कोटी रुपये त्या भिंतीतून बाहेर आले. त्या लोकांनाही ते मोजायला बरेच दिवस लागले. हे सर्व पैसे त्या घराच्या मालकाकडे जमा झाले होते, या पैशावर मजुरानेही आपला हक्क सांगितला होता. बराच वेळ त्या घराचा मालक मजुराला पैसे देण्यास टाळाटाळ करत होता.
यानंतर मजुराने या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयात युक्तीवाद करताना त्यांनी सांगितले की, या पैशावर आपलाही अधिकार आहे कारण त्यावेळी तेथे कोणीही उपस्थित नव्हते. हवे असते तर तो हे सर्व पैसे गुपचूप ठेवू शकलो असतो. या प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी सुरू झाली आहे. आता यावर काय निर्णय होतो हे पाहावे लागेल. त्यातील बराचसा पैसा घरमालकाने खर्च केल्याचे सांगितले जात आहे.