बापरे!! मोलकरीण, डिलिव्हरी बॉयने लिफ्ट वापरल्यास १ हजाराचा दंड; सोसायटीतला फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 01:52 PM2023-11-29T13:52:06+5:302023-11-29T13:54:31+5:30

सोशल मीडियावर या निर्णयाविरोधात जोरदार टीका होतेय

Trending story lift use maid uses housing society lift fine 1000 rs shocking | बापरे!! मोलकरीण, डिलिव्हरी बॉयने लिफ्ट वापरल्यास १ हजाराचा दंड; सोसायटीतला फोटो व्हायरल

बापरे!! मोलकरीण, डिलिव्हरी बॉयने लिफ्ट वापरल्यास १ हजाराचा दंड; सोसायटीतला फोटो व्हायरल

Lift Use 1000 Rupees Fine : टोलेजंग इमारती ही सध्याच्या काळातील गरज आहे. वाढती लोकसंख्या पाहता मोठ्या आणि उंच इमारती गरजेच्या आहेत. इमारतींची उंची वाढल्याने प्रत्येक इमारतीत लिफ्टची सुविधाही जरूरीची आहे. लिफ्ट ही लोकांच्या सोयीसाठी असते. पण एका सोसायटीत याच लिफ्टवरून वाद झाल्याचे दिसत आहे. हैदराबादमधील एका सोसायटीने एक नोटीस जारी केली आहे. त्यात असे म्हटले आहे की घरगुती मदतनीस (मोलकरीण), डिलिव्हरी बॉय आणि इतर कर्मचाऱ्यांनी मुख्य लिफ्ट वापरल्यास त्यांच्याकडून १ हजार रुपयांचा दंड आकारला जाईल. या निर्णयाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे. लोक या निर्णयाला भेदभाव करणारा निर्णय म्हणत आहेत. सोसायटीने लावलेल्या या नोटीशीचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. जाणून घेऊया यामागाचे प्रकरण.

युजर शाहिना अत्तरवालाने एक पोस्ट लिहून या निर्णयावर टीका केली आहे. तिच्या म्हणण्यानुसार, लिफ्टमध्ये असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की मोलकरीण, डिलीव्हरी बॉय किंवा कर्मचारी वर्गाने मुख्य लिफ्टचा वापर करू नये. जर ते पकडले गेले तर त्यांना हजार रूपयांचा दंड लावला जाईल. शाहीनाने यावर मत मांडताना पोस्टमध्ये लिहिले आहे की, समाजातील काही वाईट गोष्टींवर भाष्य करू नये अशाप्रकारे आपली जडणघडण केली जाते. पण आता असे दिसून येते की जे लोक आपल्यासाठी मेहनत करतात त्यांना आपण आपल्यासारख्या सुविधांपासून वंचित ठेवतो आहोत. फोटोत लिहिले आहे की 'ते जर पकडले गेले तर'? ते काही गुन्हा करत आहेत का? हजार रूपयांचा दंड? हजार रूपये हे त्यातील कित्येक लोकांच्या मानधनाच्या २५ टक्के असतील!

दरम्यान, या पोस्टनंतर अनेकांनी या सोसायटीच्या व्यवस्थापनाविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. पण सोसायटीच्या व्यवस्थापनाने मात्र याबाबत काहीही सांगितलेले नाही. फोटोत लिहिल्याप्रमाणे ठराविक लोकांनी त्या लिफ्टचा वापर करू नये असे सांगण्यात आले आहे. पण त्याऐवजी पर्यायी लिफ्ट किंवा इतर कोणता पर्याय आहे का, याबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही.

Web Title: Trending story lift use maid uses housing society lift fine 1000 rs shocking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.