Video: बोलो जुबाँ केसरी.... नव्या नवरीने भररस्त्यात खाल्ला गुटखा, नवरा बघतच बसला!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 02:27 PM2023-05-29T14:27:16+5:302023-05-29T14:29:34+5:30

सामुहिक विवाह झाल्यावर जोडपं घरी जात असताना रस्त्यात थांबले त्याच वेळी...

trending video bride eating gutkha pan masala in front of husband just after marriage viral social media | Video: बोलो जुबाँ केसरी.... नव्या नवरीने भररस्त्यात खाल्ला गुटखा, नवरा बघतच बसला!

Video: बोलो जुबाँ केसरी.... नव्या नवरीने भररस्त्यात खाल्ला गुटखा, नवरा बघतच बसला!

googlenewsNext

Viral Video, Bride eating gutkha: सोशल मीडियावर एका नवविवाहित जोडप्याचा व्हिडिओ खूप पाहिला जात आहे. कारण पुरुषांना गुटखा चघळताना खूपदा पाहिलं असेल, पण एका नवरीने असंच केलं तेव्हा तिचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला. खरं पाहता, स्त्री असो वा पुरुष, पान-मसाला, गुटखा खाणे प्रत्येकाच्या आरोग्यासाठी हानिकारकच आहे. पण वधूला पान-मसाला खाताना पाहून लोकांना हसू आवरता आलं नाही. ही घटना राजस्थानमधील बारां येथील असल्याचा दावा केला जातोय.

व्हायरल झालेला व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. बारां येथे सर्व जोडप्यांचा सामूहिक विवाह झाला. त्यानंतर एक जोडपे घरी जात होते. त्यावेळी रस्त्यात काही कारणास्तव ते थांबले. नवरदेवाचे फोनवर बोलणे सुरू झाले. त्याच वेळी नववधूने गुटख्याची पुडी काढली आणि त्यात मिश्रण करून पतीसमोरच गुटखा खाल्ला. या प्रकारानंतर व्हिडीओ भलताच व्हायरल झाला आहे.

ही क्लिप फक्त 15 सेकंदांची आहे. एका कारमधून व्हिडीओ शूट करण्यात आली आहे. नवरा फोनवर बोलताना दिसतो. वधू हातात एक पॅकेट धरते, त्यात काहीतरी मिसळते आणि हलवते. एका पान-मसाला मिसळला जातो तसेच तिनेही केले. त्यानंतर भररस्त्यात तिने गुटखा खातात तसेच ती पुडी तोंडात ओतली आणि रिकामे पॅकेट बाजूला फेकले.

हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला असून लोक या व्हिडीओवर भन्नाट कमेंट्स करत आहेत. रिपोर्टनुसार, 26 मे रोजी राजस्थानच्या बारांमध्ये सामूहिक विवाहाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये 2 हजार 222 जोडप्यांनी लग्नगाठ बांधली होती. या विवाह सोहळ्याचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवले गेले.

Web Title: trending video bride eating gutkha pan masala in front of husband just after marriage viral social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.