Wedding ceremony just 135 Rupees: लय भारी! ना बँडबाजा ना पंगत; यवतमाळमध्ये फक्त १३५ रूपयांमध्ये पार पडला विवाहसोहळा 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 01:58 PM2021-03-14T13:58:02+5:302021-03-14T14:03:27+5:30

Trending Viral News : विशेष म्हणजे दोघेही मूक बधिर आहेत. या दोघांच्याही नातेवाईकांनी पुढाकार घेऊन गे लग्न जमवलं.

Trending Viral News : wedding ceremony in yavatmal for just rs 135 | Wedding ceremony just 135 Rupees: लय भारी! ना बँडबाजा ना पंगत; यवतमाळमध्ये फक्त १३५ रूपयांमध्ये पार पडला विवाहसोहळा 

Wedding ceremony just 135 Rupees: लय भारी! ना बँडबाजा ना पंगत; यवतमाळमध्ये फक्त १३५ रूपयांमध्ये पार पडला विवाहसोहळा 

googlenewsNext

लग्न म्हटलं की, खर्च, पाहूणे,  जेवणाचा मेन्यू, खरेदी हे सगळं आलंच. घरात  एखादं लग्न कार्य करायचं म्हटलं तर लोक आयुष्यभर कमावलेले पैसे खर्च करतात आणि थाटामाटात सोहळा करतात. सध्या कोरोनाचं सावट असल्यामुळे अनेक ठिकाणी ५-१० नातेवाईकांना बोलावून अनेकांनी लग्न उरकलं. सोशल मीडियावर अशाच एका लग्नाचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण फक्त १३५ (Wedding ceremony in Yavatmal for just Rs 135)रुपयांमध्ये हा विवाह सोहळा पार पडला आहे. 

यवतमाळमध्ये हा अनोखा लग्न सोहळा पार पडला आहे. वधू मंगला संजय श्रीरामजिकर ही यवतमाळ तालुक्यात येणाऱ्या अकोला बाजार कामठवाडा येथील रहिवासी आहे तर वर राजेश बोरकर अमरावती येथील दस्तुरनगर येथे वास्तव्यास आहेत. विशेष म्हणजे दोघेही मूक बधिर आहेत. या दोघांच्याही नातेवाईकांनी पुढाकार घेऊन गे लग्न जमवलं.

खर्च कमी येण्यामागचं कारण म्हणजे कमीत कमी नातेवाईकांची उपस्थिती या लग्नाला होती. मुलाचे आई वडील, काका, काकू आणि मुलीचे आई वडील, बहीण, भाऊ एवढेच लोक लग्नाला हजर होते.  सर्व नातेवाईक नोंदणी कार्यालयात आले आणि केवळ135 रुपये खर्च करून हे लग्न उरकलं. Yoga on a moving bicycle : बाबो! चालत्या सायकलवर योगा करतेय तरूणी; हवेत हात पसरवून सुरू होतात स्टंट; पाहा व्हिडीओ

लाखो रूपये खर्च न करता, पाहूणे  गोळा न करता साध्या पध्दतीने कार्यक्रम पार पडू शकतो हे या दोन्ही कुटुंबांनी दाखवून दिल्यामुळे सोशल मीडियावर या कुटुंबांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.  कोरोनाकाळात  संक्रमण टाळण्यासाठी लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमांसाठी शासनाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे.  कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कोणत्याही कार्यक्रमात तसंच गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क लावणं, सोशल डिस्टेंसिंगसह स्वच्छतेच्या नियमांचे पालन करायला हवे.  लग्नानंतर उलगडलं २५ वर्षीय महिला पुरूष असल्याचं रहस्य, वर्षभर करत राहिली गर्भवती होण्याचा प्रयत्न...

Web Title: Trending Viral News : wedding ceremony in yavatmal for just rs 135

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.