Trick Question: तुम्ही देऊ शकता का या ट्रिकी प्रश्नाचं उत्तर? गणिताचे मास्टर असाल तर बघा ट्राय करून
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 02:56 PM2022-04-13T14:56:29+5:302022-04-13T14:58:01+5:30
Math Question: एका फेसबुक पेजने सोशल मीडियावर गणिताचा एक प्रश्न विचारला आहे. या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी लोक कामी लागले आहेत. टोनी पेज नावाच्या एका यूजरने फेसबुकवर हा प्रश्न विचारला आहे.
Math Question: सोशल मीडियावर अलिकडे असे ट्रिकी फोटो व्हायरल झाले आहेत, ज्यांचं उत्तर देता देता लोक घामाघूम होतात. फोटोकडे तासंतास पाहूनही लोक उत्तर देऊ शकत नाहीत. लोक एकतर चुकीचं उत्तर देतात नाही तर देतच नाहीत. त्यांना प्रश्नाचं उत्तरच समजत नाही. असाच एक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
एका फेसबुक पेजने सोशल मीडियावर गणिताचा एक प्रश्न विचारला आहे. या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी लोक कामी लागले आहेत. टोनी पेज नावाच्या एका यूजरने फेसबुकवर हा प्रश्न विचारला आहे.
या फोटोत तुम्ही बघू शकता की, नळातून पाणी येत आहे. लोकांना विचारण्यात आलं की, नळाखालील कोणता ग्लास सर्वातआधी भरला जाईल? हे ग्लास एकमेकांना जोडलेले आहेत. काही ग्लास ब्लॉक केलेले आहेत. त्यामुळे कोणता ग्लास आधी भरेल याचं बरोबर उत्तर देण्यासाठी तुम्हाला बराच वेळ घ्यावा लागेल.
जर तुम्हीही या प्रश्नाने कन्फ्यूज झाले असाल तर काही यूजर्सनी दिलेल्या उत्तरांपैकी एक उत्तर आहे की, या फोटोत सर्वातआधी ३ नंबरचा ग्लास भरेल. कारण पाण्याची धार ३ नंबरच्या ग्लासमध्ये आधी येईल. या ग्लासमधून ना चार नंबरमध्ये जाणार ना पाच नंबरमध्ये.