गादीवर डाग लागलेत, कुब्बट वास येतोय? दूर करण्यासाठी काही सोप्या घरगुती टिप्स...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 03:21 PM2024-09-23T15:21:21+5:302024-09-23T15:22:52+5:30
Mattress Cleaning Tips : तशी तर गादी स्वच्छ करण्यासाठी बाजारात वेगवेगळी उत्पादने मिळतात. पण यासाठी लागणारे पैसे वाचवून तुम्ही घरातील काही गोष्टींचा वापर करून स्वच्छता करू शकता.
Mattress Cleaning Tips : तशी तर गादी रोज स्वच्छ करण्याची गरज पडत नाही. पण महिन्यातून एकदा गादीची चांगली स्वच्छता करायला हवी. कारण अनेक यात धूळ-माती, बॅक्टेरियासोबतच घाम, लहान मुलांच्या लघवीचे डाग तसेच राहतात. तशी तर गादी स्वच्छ करण्यासाठी बाजारात वेगवेगळी उत्पादने मिळतात. पण यासाठी लागणारे पैसे वाचवून तुम्ही घरातील काही गोष्टींचा वापर करून स्वच्छता करू शकता.
इन्स्टाग्रामवर यासंबंधीचा एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यात गादी स्वच्छ करण्यासाठी काही जबरदस्त टिप्स सांगण्यात आल्या आहेत. ज्याद्वारे तुम्ही गादीची आतून सफाई करू शकता.
शेविंग क्रीम दूर करा घामाचे डाग
जर तुमच्या गादीवर घामाचे डाग दिसत असतील तर ते दूर करण्यासाठी तुम्ही शेविंग क्रीमचा वापर करू शकता. यात असलेल्या एंझाइमने डाग हलके होतात, जे सहजपणे निघून जातात. साठी डागांवर शेविंग क्रीम चांगल्या पद्धतीने लावा आणि एका ब्रशच्या मदतीने घासा. नंतर एक तासांसाठी ते तसंच राहू द्या आणि नंतर एका भिजवलेल्या कापडाने हे पुसून घ्या. ही ट्रिक तुम्ही सगळ्या प्रकारच्या मेट्रेसवर वापरू शकता.
घाणेरडा वास होईल दूर
जर तुमच्या गादीमधून कुब्बट वास येत असेल तर तो दूर करण्यासाठी तुम्ही बेकिंग सोड्यााचा वापर करू शकता. यासाठी एका रिकाम्या भांड्यात बेकिंग सोडा टाका आणि त्यात काही थेंब एसेंशिअम ऑइल टाकून चांगलं मिक्स करा. आता हे मिश्रण गादीवर स्प्रे करून काही वेळ तसंच राहू द्या. नंतर ते व्हॅक्यूम करा. याने गादी फ्रेशही राहील आणि रूममध्ये सुगंधही येईल.
डीप क्लीनिंग ट्रिक
जर तुम्हाला गादी आतून चांगली स्वच्छ करायची असेल तर त्यासाठी तुम्ही आयरन म्हणजे इस्त्रीचा वापर करू शकता. यासाठी एका स्वच्छ बाउलमध्ये एक चमचा बेकिंग सोडा, अर्धा कप लॉन्ड्री डिटर्जेंट आणि एक चमचा टूथपेस्ट मिक्स करा. या गोष्टी गरम पाण्यात मिक्स करा. नंतर एक स्वच्छ कापड या मिश्रणात भिजवून गादीवर ठेवा. आता इस्त्री लोवरून मिडिअम टेम्प्रेचरवर सेट करा आणि कपड्यात गुंडाळून गादीवर हलक्या हाताने फिरवा. ही ट्रिक फोमच्या गादीसाठी कामी पडणार नाही.