Truck and Car Funny Viral Video: एका खड्ड्यातून दुसऱ्या खड्ड्यात... ट्रक अन् कारचा हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही येईल हसू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 04:31 PM2022-05-30T16:31:11+5:302022-05-30T16:32:44+5:30

ट्रकने दोरी बांधलेली कार खेचली पण...

Truck Car Funny Viral Viral car fell into another pothole while taking out from first hole people laughed | Truck and Car Funny Viral Video: एका खड्ड्यातून दुसऱ्या खड्ड्यात... ट्रक अन् कारचा हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही येईल हसू

Truck and Car Funny Viral Video: एका खड्ड्यातून दुसऱ्या खड्ड्यात... ट्रक अन् कारचा हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही येईल हसू

googlenewsNext

Truck and Car Funny Viral Video: कधी कधी खड्ड्यांत वाहनं अडकलं तर काही ना काही उपाय करून ते बाहेर काढलं जातं, हे आपण पाहिलंच आहे. सामान्यतः वाहन बाहेर काढताना पूर्ण सुरक्षा बाळगूनच वाहनाना बाहेर काढतात. काही वेळा वाहन इतकं विचित्र अडकलेलं असतं की ते बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. असाच एका मोठ्या खड्ड्यात कार अडकल्याचा व्हिडीओ बराच व्हायरल होताना दिसत आहे. ही कार बाहेर काढण्यासाठी जे प्रयत्न केले गेले, त्याच्या शेवटी साऱ्यांनाच हसू फुटेल यात शंका नाही.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक कार रस्त्याच्या कडेला एका मोठ्या खड्ड्यात पडलेली असते. ती सुरक्षित बाहेर काढण्यासाठी ट्रकचा वापर केला जातो. ट्रकला मागच्या बाजूला दोरी बांधून ती कारला बांधली जाते. त्यानंतर ट्रक ती कार जोरात ओढतो, पण ती कार बाहेर येताच रस्त्याच्या पलीकडे आणखी मोठ्या खड्ड्यात पडते. पाहा व्हिडीओ-

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून काही लोक त्या कार मालकासाठी दु:ख व्यक्त करत आहेत. तर काही लोकांना हसू आवरत नसल्याचेही दिसून येत आहे. हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर @LosDarwinAwards नावाच्या युजरने शेअर केला आहे. अवघ्या 50 सेकंदांच्या या व्हिडिओला आतापर्यंत अडीच लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर ८ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केलं आहे.

Web Title: Truck Car Funny Viral Viral car fell into another pothole while taking out from first hole people laughed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.