२० लाखांच्या टोमॅटोने भरलेला ट्रक बेपत्ता! व्यापाऱ्यांनी केली तक्रार; नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 12:30 PM2023-07-31T12:30:40+5:302023-07-31T12:32:06+5:30

कोलारहून राजस्थानला निघालेला २० लाख रुपयांच्या टोमॅटोने भरलेला ट्रक बेपत्ता झाल्याचे प्रकरण समोर आले आहे.

truck loaded with tomatoes worth 20 lakhs mysteriously missing traders lodged fir | २० लाखांच्या टोमॅटोने भरलेला ट्रक बेपत्ता! व्यापाऱ्यांनी केली तक्रार; नेमकं प्रकरण काय?

२० लाखांच्या टोमॅटोने भरलेला ट्रक बेपत्ता! व्यापाऱ्यांनी केली तक्रार; नेमकं प्रकरण काय?

googlenewsNext

देशभरात टोमॅटोच्या दराने मोठी उसळी घेतली आहे. देशभरात टोमॅटोचे दर २०० रुपयांवर गेले आहेत. काही शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी टोमॅटोची विक्री करून मोठा नफा कमावला आहे. यासोबतच टोमॅटो चोरी आणि लुटीच्या अनेक बातम्याही समोर आल्या आहेत. आता नुकत्याच घडलेल्या एका घटनेत, कर्नाटकातील कोलार येथून राजस्थानकडे निघालेला २० लाख रुपये किमतीचा टोमॅटोचा ट्रक गूढपणे बेपत्ता झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. या संदर्भात व्यापाऱ्यांनी कोलार पोलिसांकडे तक्रार दाखल केली. यामध्ये २७ जुलै रोजी कोलार एपीएमसी यार्डमधून राजस्थानमधील जयपूरला टोमॅटो घेऊन जाण्यासाठी दोन व्यापाऱ्यांनी ट्रक बुक केले होते.

अजुनही टोमॅटोचे दर कमी आलेले नाहीत. १५० ते २०० रुपये किलो टोमॅटोचे दर आहेत. टोमॅटोने भरलेला ट्रक शनिवारी रात्री जयपूरला पोहोचायला पाहिजे होता, पण ट्रक त्या वेळेत पोहोचला नाही.  चालकाचा मोबाईल फोन बंद आहे. ट्रक ऑपरेटरशी देखील योग्य प्रकारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. कोला व्यापार्‍याने काही गैरप्रकार झाल्याचा संशय आल्याने पोलिसात तक्रार दाखल केली.

लांब, छोटी की मध्यम...तुमच्या माने आकार सांगतो तुमच्या पर्सनॅलिटीबाबत खूपकाही

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जीपीएस ट्रॅकरनुसार, ट्रकने कोलारपासून सुमारे १,६०० किमी अंतर कापले होते. त्यानंतर वाहनाचा पत्ता समजला नाही. ट्रकच्या क्लिनरकडे मोबाईल नसल्यामुळे ट्रकचा शोध घेण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. टोमॅटोने भरलेला ट्रक गायब झाल्याबद्दल चिंता व्यक्त करत, ट्रकला अपघात झाला असता तर आतापर्यंत माहिती मिळाली असती, असे व्यापाऱ्यांनी म्हटले आहे. चालक ट्रक घेऊन पळून गेला अशी भीती व्यक्त केली जात आहे. 

Web Title: truck loaded with tomatoes worth 20 lakhs mysteriously missing traders lodged fir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.