बाबो! भर मंडपात मुलीने नवरदेवाला केला पळून जाण्याचा इशारा? जाणून घ्या Viral व्हिडीओमागचं सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 04:11 PM2021-07-07T16:11:54+5:302021-07-07T16:12:21+5:30
Social Viral : हा व्हिडीओत नुसता व्हायरल झाला असं नाही तर व्हिडीओ व्हायरल झाल्यावर यातील तरूणीला आणि नवरदेवाला मनस्तापही झाला आहे.
सोशल मीडियावर अलिकडे लग्नातील वेगवेगळे मजेदार व्हिडीओ अधिकच व्हायरल होत आहेत. यातील काही व्हिडीओ काही मिनिटांमध्येच इतके चर्चेत येतात की, सगळीकडे त्यांची चर्चा होत राहते. असाच एक लग्नातील मजेदार व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडीओत नुसता व्हायरल झाला असं नाही तर व्हिडीओ व्हायरल (Viral Marriage Video) झाल्यावर यातील तरूणीला आणि नवरदेवाला मनस्तापही झाला आहे.
हा व्हिडीओ एका मराठमोळ्या लग्नातील असल्याचं लगेच लक्षात येतं. स्टेजवर नवरी-नवरदेव लग्नाचे रितीरिवाज करण्यास बसले आहेत. अशात एक मुलगी नवरदेवाला पळून चल असा इशारा करताना दिसत आहे. या व्हिडिओ मागचं सत्य समोर आलं आहे. (हे पण बघा : VIDEO : टल्ली होऊन लग्नात पोहोचला नवरदेव, नवरीने केलं असं काही बघत राहिले सगळे!)
गेल्या आठवड्यात मुंबईत हा लग्न सोहळा पार पडला. अनेकांना हा व्हिडीओ पाहिल्यावर असं वाटलं की, हा सगळा प्रकार खरंच नवरदेवासोबत घडला. पण असं काही नाहीये. ही केवळ मित्रांमधील गंमत होती आणि ती गंमतच दोघांच्याही मनस्तापाचं कारण ठरली आहे. नवरदेव विजय मुणगेकर याची अंकिता प्रभू वालावलकर ही मैत्रिण आहे. लग्नावेळी थट्टा मस्करी सुरू असताना हा व्हिडीओ काढला. हा व्हिडीओ अवघ्या काही दिवसांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला. (हे पण बघा : Viral Video : स्टेजवरच सुटला नवरदेवाचा पायजमा अन् खदकन हसली नवरी....)
व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, अंकिता आपला नवरदेव मित्र विजयला गमतीत चल पळून जाऊ....असा इशारा करत आहे. तिला इशाऱ्यातच उत्तर देत विजय म्हणतो की,'आता काय करणार? जाऊ दे'. दोघांच्याही या इशाऱ्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
गंमत म्हणून रेकॉर्ड केलेल्या या व्हिडीओमुळे नवरदेव विजय आणि नवरी मयुरी सोशल मीडियावर चर्चेत आले. या व्हिडीओमुळे त्यांची थोडी अडचण होत आहे. मस्करीत केलेल्या या व्हिडिओमुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय. सोशल मीडियावर काहीही शेअर करताना विचार केला नाही तर असाच मनस्ताप होऊ शकतो हे दिसून येतं.