व्हेंटिलेटरवरील रुग्णाने कोरोनाला हरवल्यानंतर, डॉक्टरने आनंदाच्या भरात केलं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 06:28 PM2020-04-24T18:28:02+5:302020-04-24T18:38:57+5:30

एका वयस्कर व्यक्तीला कोरोनाचं संक्रमण झालं होतं.  गेल्या काही आठवड्यांपासून या व्यक्तीच्या प्रकृतीत काही सुधारणा होत नव्हती.

Turkish doctor does moonwalk dance after covid 19 patients condition improve Viral video myb | व्हेंटिलेटरवरील रुग्णाने कोरोनाला हरवल्यानंतर, डॉक्टरने आनंदाच्या भरात केलं असं काही...

व्हेंटिलेटरवरील रुग्णाने कोरोनाला हरवल्यानंतर, डॉक्टरने आनंदाच्या भरात केलं असं काही...

googlenewsNext

कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असताना एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे .तुर्कीमधील एका डॉक्टरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमधील डॉक्टर कोरोना रुग्णावर उपचार करत होते. एका वयस्कर व्यक्तीला कोरोनाचं संक्रमण झालं होतं.  गेल्या काही आठवड्यांपासून या व्यक्तीच्या प्रकृतीत काही केल्या सुधारणा होत नव्हती. पण हा वयस्कर व्यक्ती कोरोनाच्या संक्रमणातून रिकव्हर होऊ लागला. तेव्हा या डॉक्टरांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

कोरोना रुग्ण बरा झाल्याचे कळताच या डॉक्टरांनी नाचायला सुरूवात केली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ लोकांना खूप आवडला आहे.  या डॉक्टरचं नाव अदनान असून तुर्कीतील अंकारामध्ये हे रुग्णालय आहे.  या डॉक्टरचं वय ३४ वर्ष आहे. व्हेंटिलेटरवर असलेल्या कोरोना रुग्णाला बरं झालेले पाहून या डॉक्टरांना  खूप उत्साह आला, म्हणून आनंदाने नाचायला सुरूवात केली आहे.  कोरोनापासून लढण्यासाठी सकारात्मक उर्जा देण्याासाठी डान्स केल्याचं या डॉक्टरांनी सांगितलं आहे. 

Web Title: Turkish doctor does moonwalk dance after covid 19 patients condition improve Viral video myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.