आत्ताच्या आत्ता काटकोनात वळा! प्रवासी विमान बॅलेस्टिक मिसाईलच्या वाटेत आले अन् खळबळ उडाली, Video
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 01:47 PM2022-06-01T13:47:30+5:302022-06-01T13:47:49+5:30
साऊथ चायना सीमध्ये ही घटना घडली. ते विमान कमर्शिअल फ्लाईट पाथवरूनच उड्डाण करत होते. याच्या खाली चीनच्या नौदलाकडून चाचण्या सुरु होत्या.
बॅलेस्टिक मिसाईलची चाचणी सुरु होती, मिसाईल डागले गेले आणि अचानक चीनच्या समुद्रात रडारवर एक प्रवासी विमान दिसू लागले. मोठी धावपळ उडाली, एटीसीने या विमानाला तातडीने ९० अंशांच्या कोनात वळण्याचे आदेश दिले. एटीसी आणि पायलटने प्रसंगावधान राखले आणि मोठा प्रसंग टळला.
साऊथ चायना सीमध्ये ही घटना घडली. ते विमान कमर्शिअल फ्लाईट पाथवरूनच उड्डाण करत होते. याच्या खाली चीनच्या नौदलाकडून चाचण्या सुरु होत्या. यानंतर विमानातून या मिसाईलचा व्हिडीओ काढण्यात आला. तो व्हायरल होत आहे. चीनच्या युद्धनौकेतून प्लान मिसाईलची चाचणी घेण्यात येत होती. या भागात चीन आणि उत्तर कोरिया युद्धसराव करत असल्याने आधीच तणाव होता. यातच ही घटना घडल्याने खळबळ उडाली होती.
A fellow Airline Pilot friend just sent me this from one of his colleagues at a foreign airline. They were over the South China Sea & were issued a last-minute hectic call from ATC: “turn left 90 degrees immediately!!” Chinese sea launched ballistic missile from a PLAN Submarine! pic.twitter.com/Zf1lf1zCu3
— Captain Overnight (@jchovernut) May 24, 2022
कॅथे पॅसिफिक बोईंग 777 या विमानातून हा व्हिडीओ रेकॉर्ड केल्याचा दावा करण्यात आला आहे. तर कॅथे पॅसिफिकने अशी कोणती घटना घडली नाही, असे म्हटले आहे. व्हिडिओच्या शूटिंगची खरी तारीख आणि स्थान अज्ञात आहे. या प्रदेशात क्षेपणास्त्र किंवा रॉकेट प्रक्षेपणांशी संबंधित कोणत्याही नोटिस टू एअरमेन (NOTAM) किंवा इतर कोणतेही फोटो नाहीत. चीननेही आपण अशी कोणते मिसाईल फायर केल्याचे नाकारले आहे.
परंतू, उत्तर कोरियाने 7 मे रोजी पाणबुडीतून लाँच करता येणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली, परंतु ती जागा दक्षिण चीन समुद्रापासून काहीशी दूर होती. उत्तर कोरियाचे क्षेपणास्त्र प्रक्षेपण जपानच्या उत्तरेकडे जाणार्या कॅथे पॅसिफिक विमानाच्या क्रूने पाहिले होते. परंतू हा तेव्हाचा व्हिडीओ आहे हे देखील स्पष्ट होत नाहीय.