Video : लाईव्ह रिपोर्टिंगवेळी पत्रकाराच्या मागे लागलं डुक्कर, अ‍ॅंकर हसून हसून झाले लोटपोट!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 12:00 PM2019-11-28T12:00:04+5:302019-11-28T12:00:26+5:30

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या सत्ता स्थापनेच्या गोंधळात पत्रकारांना कशी धावपळ करावी लागतीये हे बघायला मिळत आहे.

TV reporter chased by pig during live reporting in Greece viral video | Video : लाईव्ह रिपोर्टिंगवेळी पत्रकाराच्या मागे लागलं डुक्कर, अ‍ॅंकर हसून हसून झाले लोटपोट!

Video : लाईव्ह रिपोर्टिंगवेळी पत्रकाराच्या मागे लागलं डुक्कर, अ‍ॅंकर हसून हसून झाले लोटपोट!

Next

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या सत्ता स्थापनेच्या गोंधळात पत्रकारांना कशी धावपळ करावी लागतीये हे बघायला मिळत आहे. यासंबंधी बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकार कसे धावपळ करतात हे बघायला मिळत आहे. तसेच त्यांच्या समोरील आव्हानंही बघायला मिळत आहेत. याचंच एक उदाहरण असलेला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. तुम्ही टीव्हीवर अनेक पत्रकारांना नेहमीच लाईव्ह रिपोर्टींग करताना बघता. पण ते जेथून लाईव्ह करत आहेत, ते ठिकाण फारच महत्वाचं ठरत असतं. आता हेच बघा ना ग्रीसमधील एका पत्रकारासोबत लाईव्ह रिपोर्टिंग करताना असं काही झालं की, स्टुडिओमधील अ‍ॅंकर लोटपोट होऊन हसू लागले होते.

ग्रीसमधील पत्रकार लाजोस मांटिकोस पुराबाबत लाईव्ह रिपोर्टिंग करण्यासाठी एका ठिकाणी पोहोचले होते. ते यात शहरातील स्थितीबाबत माहीत देते होते आणि हे करत असताना अचानक एक डुक्कर त्यांच्या मागे लागलं. आता या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात तुम्ही बघू शकता की, लाजोस त्या डुकरापासून पिच्छा सोडवण्यासाठी अनेक प्रयत्न करताना दिसत आहे. पण ते डुक्कर काही केल्या त्यांचा पिच्छाच सोडत नाहीये. लाजोस इतके-तिकडे पळत राहिले.

लाजोस हे ग्रीसमधील 'एएनटी १' न्यूज चॅनलचे पत्रकार आहेत. त्यांनी स्थानिक माध्यमांना सांगितले की, ते डुक्कर सकाळपासून त्यांच्या टीम मागे लागलं होतं. दुसरीकडे हे लाईव्ह सुरू असताना स्टुडिओतील अ‍ॅंकर त्यांचं हसू रोखू शकले नाहीत. ते लोटपोट होऊन हसू लागले.


Web Title: TV reporter chased by pig during live reporting in Greece viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.