उठाले रे बाबा उठाले! नवरीने ठेवली 'चंद्राचा तुकडा' आणण्याची अट, दोघं आणायलाही गेले ना भौ!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 03:49 PM2021-03-30T15:49:16+5:302021-03-30T15:50:02+5:30

या क्लिपमध्ये एक नवरी दोन तरूणांसमोर अट ठेवते की, जो तिच्यासाठी सर्वातआधी चंद्राचा तुकडा आणेल ती त्याच्याशी लग्न करेल.

TV serial shows bride ask for chand ka tukda before marrige two men trying to break a piece of the moon | उठाले रे बाबा उठाले! नवरीने ठेवली 'चंद्राचा तुकडा' आणण्याची अट, दोघं आणायलाही गेले ना भौ!

उठाले रे बाबा उठाले! नवरीने ठेवली 'चंद्राचा तुकडा' आणण्याची अट, दोघं आणायलाही गेले ना भौ!

googlenewsNext

प्रेयसीला चंद्र-तारे तोडून देईल असे सांगत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण भौ, जर तिने खरंच आणायला सांगितला तर....? गंमत नाही. एका मालिकेत असा कारनामा झाला आहे. याची व्हिडीओ क्लिप पाहून सोशल मीडियावरील लोक शॉकमध्ये आहेत. काही लोकांचा तर या व्हिडीओ क्लिपवर विश्वासही बसत नाहीये. या क्लिपमध्ये एक नवरी दोन तरूणांसमोर अट ठेवते की, जो तिच्यासाठी सर्वातआधी चंद्राचा तुकडा आणेल ती त्याच्याशी लग्न करेल.

यात तुम्ही बघू शकता की, एक नवरी आहे. म्हणजे सीन तिच्या स्वयंवराचा सुरू आहे. अशात ती दोन तरूणांसमोर अट ठेवते की, जो तिच्यासाठी सर्वातआधी चंद्राचा तुकडा आणेल ती त्याच्यासोबत लग्न करेल. दोघेही लगेच कामाला  लागतात. तरूणीची ही अट ऐकून बाजूची एक महिला म्हणते की, चंद्राचा तुकडा. म्हणजे चंद्राला जमिनीवर आणावा लागेल. 

आता दोन्ही तरूण अट पूर्ण करण्यासाठी कामाला लागतात. एक तरूण स्पेशल दोराने चंद्राला खाली खेचण्याचा प्रयत्न करतो तर दुसरा तरूण उडणाऱ्या कारने चंद्राकडे जातो. अशात अचानक एक महिला ओरडते की, अमनने चंद्राचा तुकडा तोडला. एक चंद्राचा तुकडा जमिनीवर पडतोही. एकूणच काय तर विज्ञान आणि लॉजिकवर बेसुमार 'अत्याचार' इथे करण्यात आलाय.

सोशल मीडियावर या व्हिडीओची सध्या चर्चा रंगली आहे. मालिकेत दाखवलेला हा कारनामा पाहून अनेकजण 'कोमात' गेले आहेत. काहीना काही सुचेनासं झालंय. यावर भरभरून कमेंट येत आहेत. आतापर्यंत १८ हजारपेक्षा जास्त व्ह्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत. 
 

Web Title: TV serial shows bride ask for chand ka tukda before marrige two men trying to break a piece of the moon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.