अफलातून! दोन मधमाशांनी उघडलं बाटलीचं झाकण; एकीचं बळ दाखवणारा भन्नाट VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 02:32 PM2021-05-28T14:32:19+5:302021-05-28T14:35:12+5:30

दोन मधमाशांनी पद्धतशीरपणे उघडलं प्लास्टिकच्या बाटलीचं झाकण

Two Bees Work Together To Open A Bottle In Jaw Dropping Clip | अफलातून! दोन मधमाशांनी उघडलं बाटलीचं झाकण; एकीचं बळ दाखवणारा भन्नाट VIDEO

अफलातून! दोन मधमाशांनी उघडलं बाटलीचं झाकण; एकीचं बळ दाखवणारा भन्नाट VIDEO

Next

तहानलेल्या कावळ्याची गोष्ट आपल्याला माहीत आहे. पाणी पिण्यासाठी रांजणात खडे टाकून कावळ्यानं स्वत:ची तहान भागवली. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असा धडा या गोष्टीनं आपल्याला दिला. याशिवाय एकीचं बळ सांगणाऱ्या गोष्टीदेखील आपण लहानपणापासून ऐकत आहोत. यानंतर आता या दोन्ही गोष्टी एकत्रित स्वरुपात दाखवणारा एक अफलातून व्हिडीओ समोर आला आहे. 

दोन मधमाशांनी मिळून एका बाटलीचं झाकण उघडलं असं जर कोणी तुम्हाला सांगितलं तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र खरंच असं घडलंय. ब्राझीलच्या साओ पावलोमध्ये दोन मधमाशांनी मिळून एका प्लास्टिकच्या बाटलीचं झाकण उघडलं आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो लाईक्स मिळाले आहेत. व्हायरलहॉग एजन्सीनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. दोन मधमाशांनी अतिशय पद्धतशीरपणे बाटलीचं झाकण उघडल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.



दहा सेकंदांच्या व्हिडीओमध्ये दोन मधमाशा झाकणावर एकमेकांच्या विरुद्ध दिशेला बसल्या आहेत. मधमाशा झाकणाला वरच्या दिशेनं फिरवत आहेत. त्यामुळे झाकण हळूहळू वरच्या दिशेनं सरकत आहे. आपल्या पुढील पायांच्या मदतीनं मधमाशा झाकण उघडत असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं. 'माझ्या कार्यालयीन वेळेत लंच ब्रेक असताना मी हा व्हिडीओ रेकॉर्ड केला,' असं व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीनं सांगितल्याचं व्हायरलहॉगनं वृत्तात म्हटलं आहे. ट्विटरवर या व्हिडीओला १३ लाखांहून अधिक व्हूज मिळाले आहेत. यूट्यूबवरही लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

Web Title: Two Bees Work Together To Open A Bottle In Jaw Dropping Clip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.