दोन तरूणांचा अतरंगी स्टंट पाहून चक्रावेल डोकं, बघून लोक म्हणाले - हा तर वेडेपणा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 14:06 IST2024-12-21T14:06:01+5:302024-12-21T14:06:39+5:30

एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. यात दोन तरूण असं काही करताना दिसत आहेत जे तुम्ही आधी कधी बघितलं नसेल.

Two boys stunt stunned everyone watch video | दोन तरूणांचा अतरंगी स्टंट पाहून चक्रावेल डोकं, बघून लोक म्हणाले - हा तर वेडेपणा...

दोन तरूणांचा अतरंगी स्टंट पाहून चक्रावेल डोकं, बघून लोक म्हणाले - हा तर वेडेपणा...

viral video: सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ इमोशनल करणारे, काही अतरंगी तर काही हैराण करणारे असतात. इतकंच नाही तर लोक फेमस होण्यासाठी या व्हिडिओंमध्ये अशा काही गोष्टी करतात ज्या बघून डोकं चक्रावून जातं. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. यात दोन तरूण असं काही करताना दिसत आहेत जे तुम्ही आधी कधी बघितलं नसेल.

व्हायरल झालेला हा व्हिडीओ खरंच इतर व्हिडिओंपेक्षा वेगळा आणि अजब आहे. तुम्ही अनेकदा लोकांना पाळण्यावर झोका घेताना बघितलं असेल. पण कधी तुम्ही एका झाडावर चढून अशा पद्धतीने झोका घेताना कुणाला बघितलं नसेल. व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, दोन तरूण एका वाळलेल्या झाडावर चढलेले आहेत. त्यांनी दोन फांद्याच्या मधोमध एक काठी फसवली आहे. काठी दोन्ही टोकांवर दोघे बसले आणि आराम झोका घेत आहेत.

हा व्हायरल व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर jeejaji नावाच्या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत १ लाख ६८ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर लोक यावर अनेक मजेदार कमेंट्सही करत आहेत. काही लोकांना हे अचंबित करणारं वाटलं तर काहींनी हे धोकादायक असल्याचं म्हटलं.

Web Title: Two boys stunt stunned everyone watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.