Viral Video: दोन बैलांच्या लढाईत कुत्र्याने घेतली एंट्री, अन् नंतर जे झालं ते पाहुन पोट धरुन हसाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 07:52 PM2022-03-20T19:52:07+5:302022-03-20T19:55:01+5:30

बैलांमध्ये 'गँगवॉर' लागल्याचं पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये दोन बैल आपापसात भांडताना दिसत आहेत. तेव्हाच एक कुत्राही या लढाईत सामील होतो. त्यानंतर जे बघायला मिळतं ते तुम्ही आयुष्यात कदाचितच याआधी कधी पाहिलं असेल.

two bulls fighting dog enter into the fight video goes viral on internet | Viral Video: दोन बैलांच्या लढाईत कुत्र्याने घेतली एंट्री, अन् नंतर जे झालं ते पाहुन पोट धरुन हसाल

Viral Video: दोन बैलांच्या लढाईत कुत्र्याने घेतली एंट्री, अन् नंतर जे झालं ते पाहुन पोट धरुन हसाल

Next

सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात त्यात प्राण्यांशी संबंधित व्हिडिओंचाही (Animal Videos) समावेश आहे. यातील काही व्हिडिओंमध्ये प्राणी मजेशीर कृत्य करताना दिसतात, तर काहींमध्ये त्यांच्यात जोरदार भांडणही होताना दिसतं. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल (Bull Fight Video) होत आहे, ज्यामध्ये बैलांमध्ये 'गँगवॉर' लागल्याचं पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये दोन बैल आपापसात भांडताना दिसत आहेत. तेव्हाच एक कुत्राही या लढाईत सामील होतो. त्यानंतर जे बघायला मिळतं ते तुम्ही आयुष्यात कदाचितच याआधी कधी पाहिलं असेल. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि हसूही येईल.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका कच्च्या रस्त्याच्या कडेला अचानक दोन बैल एकमेकांसोबत भिडतात आणि जोरदार मारामारी करू लागतात. यादरम्यान घोड्यावर बसलेली एक व्यक्ती ही लढत पाहत असते. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, बैल एकमेकांवर कशाप्रकारे हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण अचानक एक कुत्रा भांडणात सामील होतो.

हे पाहून यातील एक बैल अतिशय चिडतो आणि तो कुत्र्याचा कान तोंडाने पकडून त्याला उचलतो अन् खाली आपटतो. यादरम्यान, दुस-या बैलाला संधी मिळते, आणि तो पांढऱ्या बैलाला शिंगाने मारतो. अशी मजेशीर झुंज तुम्ही याआधी क्वचितच पाहिली असेल, ज्यात बैलांच्या लढाईत कुत्राही सहभागी झाला.

बैलांचा हा 'गँगवॉर' व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर ir_geographic नावाच्या आयडीवर शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत 25 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर शेकडो लोकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की लोकांना हा व्हिडिओ किती आवडला आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

Web Title: two bulls fighting dog enter into the fight video goes viral on internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.