Video : तब्बल 3 महिन्यांनंतर भेटल्या दोन मैत्रिणी, व्हिडीओ पाहून लोकांचेही पाणावले डोळे!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 11:40 AM2020-06-12T11:40:33+5:302020-06-12T11:42:53+5:30

लहान मुले हे त्यांच्या फिलिंग्स कधीही लपवू शकत नाही असं म्हणतात. याचाच पुरावा देणारा एक व्हिडीओ समोर आला आहे.

Two friends meet after 3 months of quarantine video will melt your heart | Video : तब्बल 3 महिन्यांनंतर भेटल्या दोन मैत्रिणी, व्हिडीओ पाहून लोकांचेही पाणावले डोळे!

Video : तब्बल 3 महिन्यांनंतर भेटल्या दोन मैत्रिणी, व्हिडीओ पाहून लोकांचेही पाणावले डोळे!

googlenewsNext

कोरोनामुळे जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं. लोक घरात अडकून बसले. मित्र-मैत्रिणी एकमेकांना कित्येक महिने भेटू शकले नाहीत. भेट झाली असेल तर सोशल डिस्टंसिंगचा नियम लक्षात ठेवून. लहान मुले हे त्यांच्या फिलिंग्स कधीही लपवू शकत नाही असं म्हणतात. याचाच पुरावा देणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. दोन मैत्रिणी तीन महिन्यानंतर एकमेकींना भेटल्या, पण त्या ज्या पद्गतीने भेटल्या ते बघून लोकही भावूक झालेत.

रेक्स चॅपमॅनने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी लिहिले की, 9 वर्षांच्या या दोन मुली किंडरगार्टनपासून सोबत आहेत. क्वारंटाइनमध्ये 3 महिने राहिल्यानंतर दोघी एकमेकींना भेटल्या. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून लोकांना फारच पसंत पडला आहे. आतापर्यत या व्हिडीओला 17 लाख व्ह्यूज मिळाले आहेत.

या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक काळ्या रंगाची एसयूव्ही येऊन थांबते. त्यातून एक मुलगी निघते, दुसरीकडून एक मुलगी धावत तिच्याकडे जाते आणि तिला घट्ट मिठी मारते. दोघी अशा मिठी मारतात जणू त्या कित्येक वर्षांनी भेटत आहेत. 

लोकांनी भरभरून यावर कमेंट केल्या आहेत. काही लोकांनी कमेंट केल्या की, या काळात लहान मुले आपल्यापेक्षा अधिक समजदार झाले आहेत.

परीक्षेआधी लहान मुलाने केलं 'आबरा का डाबरा', लोकांना आठवले त्यांचे परीक्षेचे दिवस!

पाण्याचा थेंब मुंग्यांची तहान कसा भागवतो हे दाखवणारा अद्भूत क्षण, मुंग्यांचं हे जगणं तुम्ही याआधी कधी पाहिलं नसेल...

Web Title: Two friends meet after 3 months of quarantine video will melt your heart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.