थरारक! JCB मध्ये अकडले २ विशालकाय अजगर; शेपटी खेचताच झालं असं काही......

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 03:24 PM2021-01-20T15:24:22+5:302021-01-20T16:34:51+5:30

Trending Viral News in Marathi : चार तास बचाव कार्यानंतर दोन्ही अजगरांना जंगलात परत सोडण्यात आले.

Two giant pythons were rescued from inside a jcb machine in odisha see viral photos | थरारक! JCB मध्ये अकडले २ विशालकाय अजगर; शेपटी खेचताच झालं असं काही......

थरारक! JCB मध्ये अकडले २ विशालकाय अजगर; शेपटी खेचताच झालं असं काही......

googlenewsNext

रविवारी सकाळी ओडिसामध्ये  एका जेसीबी मशिनमध्ये दोन विशालकाय अजगर अडकलेले सापडले. त्यानंतर या अजगरांचे रेस्क्यू करण्यात आलं. वृत्तसंस्था एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार बेरहामपुर जिल्ह्यातील पल्लीगुमुला गावातील जलाशयाच्या सुशोभीकरणाच्या कार्यादरम्यान हे अजगर दिसून आले आहेत. वन्यजीव अधिकाऱ्यांनी दिलेल्या  माहितीनुसार १ अजगर ७ फुट लांब होता. तर दुसऱ्या अजगराची लांबी ११ फूट  होती. 

जेसीबीच्या वर बसलेले अजगर आढळले असता, त्या दोन अजगरांपैकी एका लहान अजगराला वाचवायला ताबडतोब यश आलं. तर दुसरा अजगर मशीनच्या आत सापडला व त्याला पकडण्यास जास्त वेळ लागला. ट्विटरवर एएनआयने शेअर केलेल्या फोटोंमध्ये वन्यजीव अधिकारी आणि अजगर पकडणारे सर्पमित्र दिसून येत आहेत. ब्रिटननंतर आता जर्मनीत सापडला कोरोनाचा नवा स्ट्रेन; आधीच्या स्ट्रेनपेक्षाही अधिक जीवघेणा ठरणार?

चार तास बचाव कार्यानंतर दोन्ही अजगरांना जंगलात परत सोडण्यात आले. बचाव मोहिमेस मदत करणारे स्वतंत्र कुमार यांनी लिहिले की, 'सर्प बचाव कार्यसंघाच्या पथकाला रविवारी सकाळी नऊच्या सुमारास एक फोन आला आणि सकाळी ९: ३० च्या सुमारास घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सहज जेसीबी मशीनच्या वरच्या बाजूला असलेल्या एका अजगराची सुटका केली. पण ११ फूट लांबीचा दुसरा अजगर मशिनच्या आत होता. त्याला वाचविण्यासाठी चार तास लागले.' गर्लफ्रेेंडसोबत कारमध्ये डोसा खात होता पती; तितक्यात पत्नीनं रंगेहात पकडलं अन्...

Web Title: Two giant pythons were rescued from inside a jcb machine in odisha see viral photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.