Viral Video : बुलेटस्वार तरुणाला दोघींनी दिला चोप, सुटका करून घेत...; पहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2024 12:27 PM2024-09-01T12:27:49+5:302024-09-01T12:31:45+5:30

Varanasi viral video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यात बुलेटस्वार तरुणाला दोन तरुणी पकडतात आणि चोप देतात. हा व्हिडीओ वाराणसी शहरातील आहे.

two girls beat bullet rider boy for teasing in varanasi video goes viral | Viral Video : बुलेटस्वार तरुणाला दोघींनी दिला चोप, सुटका करून घेत...; पहा व्हिडीओ

Viral Video : बुलेटस्वार तरुणाला दोघींनी दिला चोप, सुटका करून घेत...; पहा व्हिडीओ

Viral Video News :उत्तर प्रदेशातील वाराणसी शहरातील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दोन तरुणी आणि एक तरुण दिसत आहे, जो बुलेटवर बसलेला आहे. या बुलेटस्वार तरुणाला तरुणी चोप देतात. दोघींच्या तावडीतून सुटका करून तरुणी घटनास्थळावरून पळ काढतो. पण, तरीही या तरुणींचा राग शांत होत नाही. त्या बुलेटचेही नुकसान करतात. नेमके काय घडलंय, तेच जाणून घ्या... (Two Girls Slap Bullet Rider)

एका कारचालकाने हा व्हिडीओ शूट केल्याचे दिसत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, बुलेटस्वार तरुण आहे. त्याच्यासोबत एका तरुणीचा वाद सुरू आहे. तरुण खाली उतरतो आणि मागे बघतो. तेव्हा तरुणी त्याला मारहाण करायला सुरुवात करते. 

तरुणींनी केस धरून चोपले

त्याचवेळी दुसरी तरुणी तिथे येते. दोघी रागाच्या भरात तरुणाचे केस धरतात आणि त्याला मारायला सुरूवात करतात. तरुण पाठीमागे सरकतो, पण दोघी मारतच असतात. त्यामुळे तरुण घाबरतो आणि दोघांच्या तावडीतून सुटत बाजूला असलेल्या गल्लीतून पळ काढतो. 

त्यानंतर रागाच्या भरात दोन्ही तरुणी त्याच्या बुलेटजवळ येतात आणि बाईकला लाथा मारतात. बुलेट खाली पाडतात. त्यानंतर दुसरे दोन तरुण तिथे येतात आणि मुलीशी बोलतात, असा सगळा घटनाक्रम या व्हिडीओत दिसत आहे. 

तरुणींनी बुलेटस्वार तरुणाला मारहाण का केली?

मिळालेल्या माहितीनुसार, वाराणसीमधील हुकुलगंज परिसरात ही घटना घडली आहे. दोन्ही तरुणींनी असा आरोप केला आहे की, बुलेटस्वार तरुण त्यांची छेड काढली. त्यानंतर दोघींनी त्याला थांबवले आणि जाब विचारत चोप दिला.

Web Title: two girls beat bullet rider boy for teasing in varanasi video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.