...जेव्हा वर्चस्वासाठी १८ फुटांचे दोन किंग कोब्रा भिडतात; थरारक VIDEO व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 02:48 PM2021-09-19T14:48:44+5:302021-09-19T14:51:43+5:30

दुर्मीळ कोब्रांचा जबरदस्त संघर्ष; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Two King Cobras fight for territory at Gandahati waterfall | ...जेव्हा वर्चस्वासाठी १८ फुटांचे दोन किंग कोब्रा भिडतात; थरारक VIDEO व्हायरल

...जेव्हा वर्चस्वासाठी १८ फुटांचे दोन किंग कोब्रा भिडतात; थरारक VIDEO व्हायरल

googlenewsNext

गंडाहाटी: दोन किंग कोब्रांचा संघर्ष कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हद्दीतल्या वर्चस्वासाठी दोन सापांमध्ये जबरदस्त संघर्ष सुरू असल्याचा पाहून पर्यटकांना धक्काच बसला. ओदिशाच्या गंडाहाटी धबधब्याच्या परिसरात हा प्रकार पाहायला मिळाला. दोन सापांमध्ये कामक्रीडा सुरू असल्याचं सुरुवातीला पर्यटकांना वाटलं. मात्र हा प्रकार वेगळाच असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

दोन किंग कोब्रांचं मिलन सुरू असावं असं उपस्थित असलेल्या बहुतांश पर्यटकांना वाटलं. मात्र त्यानंतर स्थानिक प्रशासनानं वेगळीच माहिती दिली. दोन्ही सापांची लांबी, त्यांचा एकूण आकार जवळपास सारखाच आहे. त्यावरून ते दोघेही नर असून त्यांच्यात वर्चस्वावरून संघर्ष सुरू असल्याची माहिती प्रशासनानं दिली. ओदिशाच्या गजपती जिल्ह्यात गंडाहाटी धबधबा असून तो पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे.

व्हिडीओत दिसणारे दोन किंग कोब्रा १८ फुटांचे आहेत. त्यांच्या संघर्षाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. महेंद्रगिरी बायोस्फियर रिझर्व्हच्या लखारी जंगलात अशा प्रकारचे कोब्रा दुर्मीळ असल्याची माहिती वन विभागानं दिली. याआधी या सापांचा व्हिडीओ पोलीस आणि पर्यटकांनी पाहिलेला नाही. 

Web Title: Two King Cobras fight for territory at Gandahati waterfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.