दोन सिंहीणींचा सिंहावर हल्ला, नवऱ्यासाठी भांडतायत दोघी! नेटकरी म्हणाले हा त्यांचा फॅमिली मॅटर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 02:54 PM2021-11-12T14:54:54+5:302021-11-12T14:55:18+5:30

दोन सिंहिणी सिंहावर हल्ला करताना दिसत असून, या सिंहिणींच्या हल्ल्यातून वाचण्यासाठी सिंह चक्क पळून जाताना दिसत आहे.जंगलाचा राजा सिंह (Lion King) जंगलावर राज्य करतो, पण सिंहिणींसमोर त्यालाही मैदान सोडावं लागतं.

two lioness attacked on lion video goes viral on social media | दोन सिंहीणींचा सिंहावर हल्ला, नवऱ्यासाठी भांडतायत दोघी! नेटकरी म्हणाले हा त्यांचा फॅमिली मॅटर

दोन सिंहीणींचा सिंहावर हल्ला, नवऱ्यासाठी भांडतायत दोघी! नेटकरी म्हणाले हा त्यांचा फॅमिली मॅटर

Next

सिंह (Lion) हा जंगलाचा राजा म्हणून ओळखला जातो. जंगलात सिंहापेक्षा बलाढ्य कोणीही नसतं, असं मानलं जातं. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video on Social Media) होत आहे. या व्हिडीओमध्ये (Shocking Wildlife Video) दोन सिंहिणी सिंहावर हल्ला करताना दिसत असून, या सिंहिणींच्या हल्ल्यातून वाचण्यासाठी सिंह चक्क पळून जाताना दिसत आहे.जंगलाचा राजा सिंह (Lion King) जंगलावर राज्य करतो, पण सिंहिणींसमोर त्यालाही मैदान सोडावं लागतं. स्वत:ला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याला पळ काढावा लागतो, हे एका व्हायरल व्हिडीओमुळे समोर आलं आहे. या व्हिडीओमध्ये दोन सिंहिणी सिंहावर हल्ला करताना दिसत आहेत. अनेक युजर्स या व्हिडीओवर (Wildlife Viral Video) विविध प्रतिक्रिया देत आहेत.

@Thedarksnature नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये दोन सिंहिणी एका सिंहाच्या मागे लागल्या असल्याचं पाहायला मिळत आहे. सिंह पळून जाण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु सिंहिणी त्याच्यावर हल्ला करत आहेत. अखेर कसा तरी तो सिंह त्या दोघींच्या तावडीतून सुटण्यात यशस्वी होतो. हा व्हिडीओ कॅमेऱ्यात टिपला गेला असून अनेक जण व्हिडीओ पाहून आश्चर्य व्यक्त करत आहेत.. सिंह पुढे धावत आहे आणि सिंहिणी जणू त्याचा जीव घेण्यासाठी त्याचा पाठलाग करत आहेत.

या व्हिडीओला आतापर्यंत १ लाख १० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. १५०० हून अधिक जणांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे आणि अनेक जणांनी व्हिडीओवर आपली प्रतिक्रियाही व्यक्त केली आहे. काही लोकांनी याला जंगलाचा विचित्र नियम म्हटलं, तर काही लोक म्हणाले, की ही निश्चितपणे सिंहाची कौटुंबिक बाब असेल. एका युजरने कमेंट करताना, सिंहिणी आपल्या मुलांचे रक्षण करत आहेत, असं लिहिलं आहे.

Web Title: two lioness attacked on lion video goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.