कुणीतरी येणार येणार गं; अखेर 10 वर्षांनंतर पांडा देणार गुड न्यूज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 04:50 PM2020-04-08T16:50:45+5:302020-04-08T17:06:06+5:30

येथील दोन पांडांनी 'ते' केलं जे गेल्या 10 वर्षात त्यांनी केलं नाही. 10 वर्षात पहिल्यांदाच दोन पांडांनी संभोग केला.

Two pandas at an empty zoo under coronavirus quarantine finally after 10 years api | कुणीतरी येणार येणार गं; अखेर 10 वर्षांनंतर पांडा देणार गुड न्यूज

कुणीतरी येणार येणार गं; अखेर 10 वर्षांनंतर पांडा देणार गुड न्यूज

Next

कोरोना व्हायरसमुळे जगातील कित्येक देश लॉकडाऊन करण्यात आले आहेत. सगळं काही बंद आहे. पण प्रेमाला कुणी बंदिस्त करू शकत नाही. या लॉकडाऊनमुळे अनेक वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. अशीच एक घटना हॉंगकॉंगच्या प्राणी संग्रहालयातून समोर आली आहे. येथील दोन पांडांनी 'ते' केलं जे गेल्या 10 वर्षात त्यांनी केलं नाही. 10 वर्षात पहिल्यांदाच दोन पांडांनी संभोग केला.

हॉंगकॉंगच्या अ‍ॅसियन थीम पार्कमध्ये मादी पांडा यिंग यिंग आणि नर पांडा ले ले राहतात. दोघांचही वय 14 वर्षे आहे. सध्या मेटिंगचा सीझन सुरू आहे. दरम्यान दोघांनी तब्बल 10 वर्षांनंतर संभोग केला. इतकेच नाही तर दोघांचा एक फोटोही व्हायरल झाला आहे.

ले ले आणि यिंग यिंग दोघेही 2007 पासून या प्राणी संग्रहालयात राहतात. मायकल बोस जे येथील अधिकारी आहेत. ते म्हणाले की, 'हे काम फारच चांगल्या प्रकारे पार पडलं. ही नैसर्गिक मेटिंग प्रोसेस फारच एक्सायटिंग करणारी आहे. साधारणपणे कृत्रिम गर्भधारणेपेक्षा नैसर्गिक मेटिंगमध्ये पांडा गर्भवती राहण्याचा चान्स अधिक असतो'. 

हे प्राणी संग्रहालयातील प्राण्यांनाही कोरोना व्हायरसमुळे जगापासून वेगळं ठेवलं जात आहे. हे प्राणी संग्रहालय 26 जानेवारीपासून बंद आहे. त्यामुळे या मेटिंगसाठी फायदा झाला.

येथील अधिकाऱ्यांनी मीडियाला सांगितले की, यिंग यिंग गेल्या महिन्यापासूनच जास्त वेळ पाण्यात घालवत होती. तर ले ले त्याची विष्ठा तिच्या आजूबाजूला सोडून जात होता. डॉक्टरांचं मत आहे की, यिंग यिंग गर्भवती असण्याची पूर्ण शक्यता आहे. जूनपर्यंत याची पूर्ण माहिती मिळू शकेल.

लॉकडाऊननंतर शहरात, गावातील रस्त्यांवर वेगवेगळे प्राणी मनमोकळेपणाने फिरताना दिसत आहेत. हत्ती, गेंडा, मोर आणि आता या पांडांनी 10 वर्षांनी संभोग केला. आता बघू गुड न्यूज कधी मिळणार ते....

Web Title: Two pandas at an empty zoo under coronavirus quarantine finally after 10 years api

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.