कुत्र्याला वाचवण्यासाठी बर्फाळ नदीत पोलिसांनी घेतली उडी, त्यानंतर जे झालं ते पाहुन बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 07:02 PM2021-12-14T19:02:38+5:302021-12-14T19:03:15+5:30

व्हिडिओमध्ये २ पोलिस एका कुत्र्याला वाचवताना दिसत आहेत. जेव्हापासून हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे, तो लोकांना इतका आवडला आहे की, आता तुम्ही हा व्हिडिओ कोणत्याही सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.

two police saves life of dog who stuck in frozen river video goes viral on internet | कुत्र्याला वाचवण्यासाठी बर्फाळ नदीत पोलिसांनी घेतली उडी, त्यानंतर जे झालं ते पाहुन बसेल धक्का

कुत्र्याला वाचवण्यासाठी बर्फाळ नदीत पोलिसांनी घेतली उडी, त्यानंतर जे झालं ते पाहुन बसेल धक्का

Next

एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो सोशल मीडिया यूजर्सची मनं जिंकत आहे. या व्हिडिओमध्ये २ पोलिस एका कुत्र्याला वाचवताना दिसत आहेत. जेव्हापासून हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे, तो लोकांना इतका आवडला आहे की, आता तुम्ही हा व्हिडिओ कोणत्याही सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.

माहितीनुसार, हा व्हिडिओ स्पेनच्या उत्तरेकडील भागातील आहे. एका कुत्र्याला वाचवण्यासाठी २ पोलीस बर्फाळ तलावात उतरताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. तलावात अडकलेल्या कुत्र्याला बाहेर काढण्यासाठी पोलीस शर्थीचे प्रयत्न करत आहेत. तलावात एक पोलीस पुढे सरकत असताना दुसरा पोलीस त्याला मदत करत आहे. हा व्हिडीओ तुम्हाला नक्कीच आवडेल.

या घटनेनंतर स्पॅनिश पोलिसांनी सांगितले की, हा कुत्रा मंगळवारी स्पेनच्या पूर्वेकडील कॅनफ्रँकच्या जलाशयात अनेक तासांपासून अडकला होता, ज्याला २ पोलिसांनी वाचवलं. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर आल्यानंतर लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले की, पोलिस कर्मचाऱ्यांनी खरोखरच कौतुकास्पद काम केलं आहे. आणखी एका युजरने लिहिले, या दोन पोलिसांनी अप्रतिम काम केले. तिसऱ्या यूजरने लिहिले, मी अशा पोलिसांना सलाम करतो.

बातमी लिहिपर्यंत हा व्हिडिओ ७ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. यासोबतच लोकांनी हा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला जात आहे. 

Web Title: two police saves life of dog who stuck in frozen river video goes viral on internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.