Video : ५००० फुटावरून पडले दोन ७ टन वजनाचे रणगाडे; पाहा मग काय झालं...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 02:45 PM2019-09-23T14:45:23+5:302019-09-23T14:50:24+5:30

तब्बल ५ हजार फूटावरून एका विमानातून दोन टॅंक खाली पडले आणि....

Two Russian armoured vehicles are completely destroyed after plunging 5,000ft into the ground | Video : ५००० फुटावरून पडले दोन ७ टन वजनाचे रणगाडे; पाहा मग काय झालं...

Video : ५००० फुटावरून पडले दोन ७ टन वजनाचे रणगाडे; पाहा मग काय झालं...

googlenewsNext

(Image Credit : dailymail.co.uk)

रशियामध्ये युद्ध सरावादरम्यान एक धक्कादायक घटना घडली असून या घटनेची चर्चा सगळीकडे रंगली आहे. रशिया, चीन आणि भारत या देशांचा Tsentr-2019 हा एकत्र युद्ध सराव रशियामध्ये सुरू होता. दरम्यान यावेळी रशियाच्या एका विमानातून ५ हजार फूट उंचीवरून दोन रशियन टॅंक खाली टाकण्यात आले. मात्र, या दोन्ही टॅंकचे पॅराशूट वेळीच उघडले गेले नसल्याने दोन्ही टॅंकचा चेंदा-मेंदा झाला.

Daily Mail ने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना घडली तेव्हा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे सुद्धा हा सराव बघण्यासाठी आले होते. त्यांच्या उपस्थितीत ही घटना घडली आणि त्यांनी पाहिली सुद्धा. BMD-2 या एका टॅंकचं वजन ७ टन इतकं आहे. त्यामुळे ५ हजार फूट उंचीवरून ते खाली पडल्याने त्यांचा चेंदा-मेंदा झाला. सुदैवाने खाली कुणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली. 

रशियन आर्मीच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, 'काही तांत्रिक बिघाडामुळे दोन टॅंक डॅमेज झाले आहेत. सुदैवाने जमिनीवर खाली कुणीही नसल्याने यात कुणी जखमी झाले नाहीत. पॅराशूट का उघडले गेले नाहीत, याची चौकशी केली जाईल'. 

Web Title: Two Russian armoured vehicles are completely destroyed after plunging 5,000ft into the ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.