काय सांगता! १५ मिनिटांच्या प्रवासाचे ३२ लाख रुपये भाडे, उबेरचे 'हे' बिल पाहून डाळे झाले पांढरे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 12:57 PM2022-10-11T12:57:22+5:302022-10-11T13:08:09+5:30

सध्या अ‍ॅपद्वारे कार बुकिंग सेवा सुरू आहे. त्यामुळे शहरातील एका टोकावरुन दुसऱ्या टोकावर जाणे सोपे झाले आहे. अनेकजण ही सेवा वापरतात.

Uber has charged a person a fare of Rs 32 lakh for a 15-minute ride social media viral | काय सांगता! १५ मिनिटांच्या प्रवासाचे ३२ लाख रुपये भाडे, उबेरचे 'हे' बिल पाहून डाळे झाले पांढरे

काय सांगता! १५ मिनिटांच्या प्रवासाचे ३२ लाख रुपये भाडे, उबेरचे 'हे' बिल पाहून डाळे झाले पांढरे

Next

सध्या अ‍ॅपद्वारे कार बुकिंग सेवा सुरू आहे. त्यामुळे शहरातील एका टोकावरुन दुसऱ्या टोकावर जाणे सोपे झाले आहे. अनेकजण ही सेवा वापरतात. पण ही सेवा कधी कधी आपल्याला महागाची ठरु शकते. या ऑनलाईन अॅपमध्ये चुकीची बिल आल्याची प्रकरणे समोर आली आहेत. सध्या उबेर कंपनीचे एक बिल सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. एका व्यक्तीला १५ मिनिटांच्या प्रवासासाठी चक्क ३२ लाख रुपयांचे बिल आकारल्याचे समोर आले आहे. 

एका व्यक्तीने उबेर कार बुक केली, या कारमधून त्याने फक्त १५ मिनिटांचा प्रवास केला. यानंतर त्याने त्याचे बँक उखाते तपासले. त्याच्या खात्यातून चक्क ३२ लाख रुपये उबेरने कापून घेतल्याचे समोर आले.  

गावात ३ विमानतळं, मोफत दारु अन् २० रुपये लीटर पेट्रोल; सरपंचाकडून आश्वासनांचा महापूर

ब्रिटनममधील राहणारा २२ वर्षाचा ओलिवर कपलान याने ऑफिसमधून उबेरची कार बुक केली. तो त्या कारमधून ऑफीसपासून आपल्या मित्रांना भेटण्यासाठी जाणार होता. तो त्या कारमधून १५ मिनिटांत मित्रांजवळ पोहोचला. त्याने त्यावेळी उबेरचे बिल भरले. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने क्रिडीट कार्डचे बिल तपासले तेव्हा त्याच्या खात्यातून ३२ लाख रुपये गेल्याचे दिसले. 

ओलिवर याच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्याने लगेच उबेर कंपनीच्या  कस्टमर केअरशी संपर्क साधला. यावेळी त्याची चूक लक्षात आले. त्याने उबेरची कार बुक केली तेव्हा त्याने अॅपमध्ये ब्रिटनमधील मँचेस्टर हे ठिकाण टाकायचे होते, पण त्याने चुकून त्याने ऑस्ट्रेलियाच्या मँचेस्टरला ड्रॉप-ऑफ ठेवले. त्यामुळेच उबरने त्याला ऑस्ट्रेलियानुसार ३२ लाख रुपयांचे बिल केले होते. उबेरने त्याचे सर्व पैसे परत केले आणि १५ मिनिटांच्या प्रवासाचे फक्त ९०० रुपये घेतले. 

Web Title: Uber has charged a person a fare of Rs 32 lakh for a 15-minute ride social media viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.