Woman sent photo without clothes : बोंबला! तिला कारागिरांना पाठवायचा होता तुटलेल्या छताचा फोटो; कॅमेरात काहीतरी भलतंच कैद झालं, अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 12:57 PM2021-04-20T12:57:39+5:302021-04-20T13:03:56+5:30
Woman sent photo without clothes : कामगारांनी फोटो पाहताच तिच्याकडे काम करण्यास नकार दिला. तिने त्याचं कारण विचारलं, तेव्हा त्यांनी तिच्या ही बाब लक्षात आणून दिली
नकळपतणे सगळ्यांच्या हातून चूका होत असतात. लहान लहान चूकांना सांभाळता येऊ शकतं. पण कधी मोठी चूक झाली तर चांगलंच महागात पडतं. आजकाल फोनचा वापर प्रचंड वाढल्यामुळे फोटो, व्हिडीओ यांच्या माध्यमातून ज्या गोष्टी कळायला नको अशा गोष्टीही लोकांपर्यंत पोहोचतात. अशीच एक लाजिरवाणी स्थिती निर्माण करणारी चूक ब्रिटनमधल्या बकिंगमशायरमधल्या (Buckinghamshire) एका महिलेकडून घडली.
रोसिएन डॉज (Roseanne Dodge) या महिलेच्या घरातल्या किचनच्या छताचा काही भाग पडला होता, त्यामुळे भिंत नव्याने बांधण्यासाठी ती प्लास्टर करणाऱ्या कामगारांचे फोन नंबर्स फेसबुकवर शोधत होती. त्यातून तिला तिघांचे नंबर मिळाले. त्या नंबर्सवर तिने आधी भिंतीचे फोटो पाठवायचं ठरवलं, जेणेकरून या भितींचे स्थिती पाहून ते किती खर्च लागेल यााबाबत कल्पना देतील.
भारतातील सर्वात हुशार चोर ज्याने जज बनून लावला अनेक केसेसचा निकाल, ९५ वेळा झाली आहे अटक!
असा झाला गोंधळ
तुमचा विश्वास बसणार नाही पण त्या फोटोंमध्ये तिचा स्वतःचाच नग्नावस्थेतला फोटोही टिपला गेला होता. कारण भिंतीचे फोटो काढताना तिच्या घरात कोणीही नव्हतं आणि ती नग्नावस्थेत होती. अशा स्थितीत तिने फोटो काढले. भिंतीवर समोरच्या बाजूला एक आरसा होता आणि त्यात आपलं नग्न प्रतिबिंब दिसतंय, याची तिला कल्पना नव्हती. भिंतीच्या फोटोत तेही विचित्र दृश्य टिपलं गेलं आणि तिने तो फोटो लगेच त्या कामगारांना पाठवला. सध्या सोशल मीडियार हा फोटो तुफान व्हायरल होत आहे.
कामगारांकडून आला नकार
त्यानंतर कामगारांनी फोटो पाहताच तिच्याकडे काम करण्यास नकार दिला. तिने त्याचं कारण विचारलं, तेव्हा त्यांनी तिच्या ही बाब लक्षात आणून दिली. त्यापुढची गोष्ट म्हणजे तिने आपल्या एका मैत्रिणीला या चॅटचे स्क्रीनशॉट्स शेअर केले, तिथून ते व्हायरल झाले.
या घटनेनंतर या महिलेला चांगलाच धडा मिळाला आहे. पुन्हा या महिलेकडून अशी चूक होणार नाही याची ती काळजी घेईलचं पण या एका फोटोमुळे गेलेली अब्रु परत मिळू शकत नाही. या घटनेवरून सर्वच स्मार्ट फोन वापरकर्त्यांनी घडा घ्यायला हवा.