अजब गजब! खेळाडू नव्हे, थेट अंपायर्सनाच काढावं लागलं मैदानाबाहेर, पोलिसांचीही झाली एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 03:14 PM2024-01-01T15:14:04+5:302024-01-01T15:14:41+5:30

खेळाडूंवर लक्ष ठेवण्यासाठी अंपायर्स असतात पण या मॅचमध्ये...

Umpires Thrown Out Of The Ground In Massive Controversy In American Premier League | अजब गजब! खेळाडू नव्हे, थेट अंपायर्सनाच काढावं लागलं मैदानाबाहेर, पोलिसांचीही झाली एन्ट्री

अजब गजब! खेळाडू नव्हे, थेट अंपायर्सनाच काढावं लागलं मैदानाबाहेर, पोलिसांचीही झाली एन्ट्री

Massive Controversy In American Premier League : एखाद्या खेळात नियम आणि अटी पाळणे साऱ्यांनाच बंधनकारक असते. या नियमांचे नीट पालन व्हावे यासाठी व खेळाडूंच्या वर्तणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी अंपायर्स म्हणजेच पंचांची निवड केलेली असते. पण नुकत्याच घडलेल्या एका प्रकारात विचित्र कारणांमुळे चक्क अंपायर्सनाच मैदानातून बाहेर काढायची वेळ आली. अनेकदा गैरवर्तणुकीच्या मुद्द्यावर स्टेडियममधून एखाद्या प्रेक्षकाला बाहेर काढण्याची गोष्ट आपण ऐकली आहे. इतकेच नव्हे तर खेळाडूनांही काही गोष्टींवरून शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जाताना दिसतात. पण अंपायर्सना मैदानातून बाहेर काढण्याची ही अशी कदाचित पहिलीच वेळ असेल.

नक्की काय अन् कुठे घडला प्रकार?

अमेरिकन प्रीमियर लीग ( APL ) मध्ये मालक आणि पंच यांच्यात पेमेंट वरून मोठा वाद झाला. मिळालेल्या वृत्तानुसार, पंचांचा दावा आहे की त्यांना 30,000 डॉलरची थकबाकी दिली गेलेली नव्हती. तर दुसरीकडे, एपीएलने दावा केला आहे की, डाउन पेमेंट मिळाल्यानंतरही पंचांनी मालकाकडून पैशांची मागणी केली आणि सेमीफायनल थांबवण्यासाठी ब्लॅकमेल केले. आयोजकांनी सांगितले की या घटनेनंतर पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले आणि पंचांना 'फिल्डवरून बाहेर काढण्यात आले'.

एपीएलने याबाबत लिहिले की, आधी पेमेंट नाहीतर मॅच होणार नाही असा प्रकार घडत होता. डॅनी खान, विजया, ब्रायन ओवेन्स यांना सांगण्यात आले की ते पंच म्हणून ब्लॅकमेल करू शकत नाहीत, परंतु या लोभी पंचांनी सामना सुरू ठेवण्यासाठी बाहेर पडण्यास सांगितले तरीही ते थांबले नाहीत. त्यांनी हलण्यास नकार दिल्यावर पोलिसांना पाचारण करण्यात आले.

पंचांची बाजू काय?

दरम्यान, प्रसिद्ध पत्रकार पीटर डेला पेन्ना यांनी दुसऱ्या बाजूचे वक्तव्य शेअर केले आहे. पीटर डेलाने लिहिले की, 'मी विजया प्रकाश मल्लेला आहे, जो युनायटेड स्टेट्समधील पॅनेल पंचांपैकी एक आहे. गेल्या 10 दिवसात संघांसोबत काम करताना आनंद झाला. पण पंचांना पैसे दिल्यानंतर अंदाजे $30,000.00 ची शिल्लक अदा केली गेले नाही. हा स्वतःचा खर्च होत आहे. आम्ही आमच्या सेवा आणि खर्चासाठी पैसे देण्याची मागणी केली तेव्हा पोलिसांना बोलावण्यात आले. त्यामुळे आमच्याकडे सामना सोडण्याशिवाय पर्याय नव्हता असे ते म्हणाले.

Web Title: Umpires Thrown Out Of The Ground In Massive Controversy In American Premier League

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.