वाह क्या बात! फळविक्रेत्याची फळं विकण्याची नवीन स्टाईल पाहून तुम्हीही कराल कौतुक....
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 11:42 AM2020-06-28T11:42:55+5:302020-06-28T12:54:08+5:30
फळं आकारानुसार वेगवेगळ्या डब्यात जात आहेत. या मशीनला दोन्ही बाजूने रॉड लावले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एका फळ वाल्याने मस्त शक्कल लढवली आहे. एका मशिनच्या साहाय्याने डाळिंब आकाराप्रमाणे डब्ब्यात पडत आहेत. हा फळविक्रेता लांबच लांब मशीन घेऊन बसला आहे. हे मशिन खूपच सोप्या पद्धतीने काम करतं. खूपच साधी आणि महत्वाचे काम करेल अशी ही मशिन आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. फळं आकारानुसार वेगवेगळ्या डब्यात जात आहेत. या मशीनला दोन्ही बाजूने रॉड लावले आहेत. डाळिंबांच्या ढीगातून एक एक डाळिंब काढून तो व्यक्ती मशिनमध्ये टाकत आहे. या रॉडमधील मोकळ्या जागेतून फळं डब्यात पडत आहे. हा व्हिडीओ @ValaAfshar नावाच्या युजरने ट्विट्वर शेअर केला आहे.
The world’s most simple ‘sorting by size’ system pic.twitter.com/pYRXJFPi8u
— Vala Afshar (@ValaAfshar) June 26, 2020
तुमचा विश्वास बसणार नाही पण काही वेळाच हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ३४ हजारांपेक्षा लाईक्स आणि १२ हजाारांपेक्षा जास्त रिट्विट्स आले आहेत. तर २० लाखापेक्षा व्हिव्हज मिळाले आहेत. याआधी सुद्धा असाच व्हिडीओ व्हायरल झाला होता. अशी शक्कल लढवून फळविक्रेता फळं आकाराप्रमाणे वेगवेगळे करत होता. लोकांनी या व्हिडीओला तुफान प्रतिसाद दिला आहे.
क्या बात! मरण दोनदा आलं होतं जवळ, तब्बल 95 दिवसांनी कोरोनाला मात देत घरी परतला रूग्ण....
१० वर्षांच्या चिमुरडीची हुशारी पाहून ठोकाल सलाम! अपंग असूनही एका हाताने इतरांसाठी शिवतेय मास्क