'पत्नी पुन्हा पुन्हा फोन कट करते, ती नाराज आहे...', पोलीस शिपायाचा सुट्टीचा अनोखा अर्ज व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 09:12 AM2023-01-09T09:12:48+5:302023-01-09T09:17:26+5:30

Viral Letter : महाराजगंज जिल्ह्यातील नौतनवा स्टेशनमध्ये तैनात शिपायाचा हा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लग्नानंतर लगेच तो पत्नीला घरी सोडून ड्युटीवर निघून गेला.

UP police constable leave application viral wife is angry due to not getting leave | 'पत्नी पुन्हा पुन्हा फोन कट करते, ती नाराज आहे...', पोलीस शिपायाचा सुट्टीचा अनोखा अर्ज व्हायरल

'पत्नी पुन्हा पुन्हा फोन कट करते, ती नाराज आहे...', पोलीस शिपायाचा सुट्टीचा अनोखा अर्ज व्हायरल

googlenewsNext

Viral Letter : नेपाळ सीमेला लागून उत्तर प्रदेशच्या महाराजगंज जिल्ह्यातून एक अनोखी घटना समोर आली आहे. इथे एका पोलिसाच्या सुट्टीचा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अप्पर पोलीस अधीक्षकांना पाठवण्यात आलेल्या या पत्रात शिपायाने लिहिलं की, एक महिन्याआधीच लग्न झालं आहे आणि ड्यूटीवरून सुट्टी मिळत नसल्याने पत्नी नाराज आहे. फोन केला तर आईकडे फोन देते.

महाराजगंज जिल्ह्यातील नौतनवा स्टेशनमध्ये तैनात शिपायाचा हा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लग्नानंतर लगेच तो पत्नीला घरी सोडून ड्युटीवर निघून गेला. कॉल रिसीव करून न बोलताच ती फोन तिच्या सासूकडे म्हणजे शिपायाच्या आईकडे देते. 

शिपायाने हे लिहिलं की, 'मी पत्नी शब्द दिला आहे की, पुतण्याच्या वाढदिवसाला मी नक्की घरी येणार. कृपया 7 जानेवारीपासून मला 7 दिवसांची कॅज्युअल लीव म्हणजे सीएल द्यावी. तुमचे खूप आभार होती'. म्हणजे पत्नीची नाराजी दूर करण्यासाठी शिपायाने शब्दांच्या माध्यमातून विनंती पत्र लिहिलं आहे.

शिपायाचा हा अर्ज पाहून एडिशनल एसपींनी त्याला 5 दिवसांची सुट्टी मंजूर केली आहे. ज्यानंतर पत्नीला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी शिपाई घराकडे रवाना झाला. 

पत्नीच्या नाराजीचा हवाला देत शिपायाने आपल्या पुतण्याच्या वाढदिवसासाठी 7 दिवसांची सुट्टी मागितली होती. पण पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला 5 दिवसांची सुट्टी मंजूर केली. 10 जानेवारीपासून त्याची सुट्टी सुरू होईल.

Web Title: UP police constable leave application viral wife is angry due to not getting leave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.