VIDEO : मगरीच्या पिल्लाला पाजली बिअर अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 01:22 PM2019-10-14T13:22:53+5:302019-10-14T13:26:55+5:30
अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये एका व्यक्तीने जे काम केलं आहे ते ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. या व्यक्तीने केलेलं कृत्य पाहून अनेक लोक हैराण झाली असून अनेकांना त्या व्यक्तीचा रागही आला आहे.
अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये एका व्यक्तीने जे काम केलं आहे ते ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. या व्यक्तीने केलेलं कृत्य पाहून अनेक लोक हैराण झाली असून अनेकांना त्या व्यक्तीचा रागही आला आहे. एका व्यक्तीने मगरीचं एक पिल्लू पकडून त्याच्यासोबत स्टंट करत होता. एवढंच नाहीतर या व्यक्तीने त्या पिल्लाला बिअर देखील पाजली.
सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून या व्यक्तीला काही वेळाने पोलिंसाठी अटकही केली आहे. घटना घडत असताना त्या व्यक्तीसोबत त्याचा एक मित्रही तिथे उपस्थित होता. त्यालाही पोलिंसानी अटक केली आहे. फ्लोरिडा मासे आणि वन्यजीव संरक्षण आयोगाने सदर घटनेची चौकशी केली आणि दोघांनाही दोषी ठरवलं आहे.
यूएसए टुडेने दिलेल्या रिपोर्टनुसार, 27 वर्षीय टिमोथी केम्के आणि 22 वर्षीय स्टुअर्ट या दोघांना बेकायदेशीररित्या एक मगर घेऊन जाण्याच्या आरोपात अटक केली आहे. सदर घटनेबाबत समजताच फ्लोरिडा वन्यजीव संरक्षण आयोगाने तपास सुरू केला. तक्रारीमध्ये सांगण्यात आलं होतं की, टिमोथी केम्केने मगरीच्या पिल्ला पकडलं आणि त्याला बिअरदेखील पाजली. त्यानंतर ते पिल्लू जास्त आक्रमक झालं होतं.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये पाहू शकता की, टिमोथी केम्के सर्वात आधी मगरीच्या पिल्लाला हातात पकडतो आणि त्याच्या जबड्यामध्ये आपला हात ठेवतो. त्यानंतर तो त्याला बिअरदेखील पाजतो.
यूएसए की रिपोर्टनुसार, पोलिस ऑफिसर टिमोथी केम्केच्या घरी पोहोचले. त्यावेळी त्यांना सांगण्यात आलं की, दोघांनी 26 ऑगस्टला पाल्म सिटीमध्ये पकडलं होतं. त्यानंतर त्या पिल्लाला तिथेच सोडून दिलं.