Tinder वर सैफचा फोटो लावून अमेरिकन महिलेला फसवलं प्रेमाच्या जाळ्यात, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 12:26 PM2019-01-31T12:26:57+5:302019-01-31T12:30:53+5:30

ऑनलाइन डेटिंगच्या विश्वात अनेकांच्या फसवणूकीची प्रकरणे समोर येत असतात. ऑनलाइन डेटिंगसाठी टिंडर हे अ‍ॅप चांगलंच लोकप्रिय आहे.

US man dupes woman by pretending to be Saif Ali khan on Tinder | Tinder वर सैफचा फोटो लावून अमेरिकन महिलेला फसवलं प्रेमाच्या जाळ्यात, पण...

Tinder वर सैफचा फोटो लावून अमेरिकन महिलेला फसवलं प्रेमाच्या जाळ्यात, पण...

Next

ऑनलाइन डेटिंगच्या विश्वात अनेकांच्या फसवणूकीची प्रकरणे समोर येत असतात. ऑनलाइन डेटिंगसाठी टिंडर हे अ‍ॅप चांगलंच लोकप्रिय आहे. पण याच अ‍ॅपवर एका परदेशी महिलेला अभिनेता सैफ अली खानचा फोटो दाखवून फसवण्यात आलं आहे. अमेरिकेतील ४४ वर्षीय एना रोव हिला फसवण्यात आलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, याची सुरूवात २०१५ मध्ये झाली होती. 

विवाहीत आणि एका मुलाचा पिता

एनाला एका विवाहित व्यक्तीने फसवल्याचं समोर आलं आहे. या व्यक्तीला एक मुलगाही असल्याचं समजतं. २०१५ मध्ये या व्यक्तीने टिंडरवर एनाला राइट स्वाइप केलं होतं. एंथनी रॉय नावाच्या प्रोफाइलवर या व्यक्तीने सैफ अली खानचा 'कल हो ना हो' सिनेमातील फोटो ठेवला होता. एंथनी महिलेला सांगितले होते की, तो ४५ वर्षांचा आहे आणि घटस्फोटीत आहे. एनाला तेव्हा हे माहीत नव्हतं की, हा फोटो सैफ अली खानचा आहे. 

वकिल झाली एना, अशाच केसेस लढते

चार वर्षांनंतर आता एना एक वकिल झाली आहे. आणि अशाप्रकारे फसवणूक करण्यात आलेल्या केसेस लढते. तसेच ती अशा प्रकरणांमध्ये अमेरिकन पोलिसांसोबतही काम करते. त्यासोबतच ती डेटिंग अॅपवर दुसऱ्यांचा फोटो लावण्याला बेकायदेशीर श्रेणीमध्ये टाकण्याची मागणी करत आहे. 

कसं जुळलं होतं नातं?

सीबीसी रेडिओला दिलेल्या एका मुलाखतीत एनाने सांगितले की, 'एंथनी रॉयने मला सांगितले होते की, तो घटस्फोटीत आणि एका मुलाचा वडील आहे. त्याने हेही सांगितले होते की, तो नात्यांबाबत इमानदार आहे. प्रोफाइमध्ये त्याने शेवटी जे लिहिलं होतं ते मला जास्त आवडलं होतं. त्याने लिहिलं होतं की, त्याला माइंड गेम्स आणि कम्यूनिकेशनची कमतरता पसंत नाही. मला वाटलं की, त्याला स्वत:ला दगा मिळाला आहे, त्यामुळे तो मला दु:खी करणार नाही'.

भेटली आणि....

याच मुलाखतीत तिने सांगितले की, अनेक दिवस चॅट केल्यानंतर एंथनी नावाच्या या व्यक्तीला मी भेटले होते. पण भेट झाल्यावर मला माझ्या चुकीची जाणीव झाली. खरंतर अशाप्रकारे फसवणूक करणे चुकीचच आहे. पण यातील मजेदार बाब ही असेल की, याबाबत सैफ अली खानला काहीच माहीत नसण्याची शक्यता आहे. 

Web Title: US man dupes woman by pretending to be Saif Ali khan on Tinder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.