अरेरे! आईनं सोडलं, वडील तुरूंगात; ९ वर्षाच्या चिमुरड्यावर आली रस्त्यावर राहण्याची वेळ
By Manali.bagul | Published: December 16, 2020 02:13 PM2020-12-16T14:13:16+5:302020-12-16T14:24:30+5:30
Trending Viral News in Marathi : एका निराधार चिमुरड्याची कहाणी सध्या समोर आली आहे. फोटोमध्ये कुत्र्यासोबत निवांत झोपलेल्या चिमुरड्याचे नाव अंकित आहे.
(Image Credit- TOI)
लहान मुलंही देवाघरची फुलं, असं म्हटलं जातं. पण ज्यावेळी याच लहानग्यांना कमी वयातच मोठ्या संकटांचा सामना करावा लागतो. तेव्हा ही फुलं कोमेजतात. बालपणीच अंगावर जबाबदारीचं ओझं आल्याने मुलांना आयुष्याचा खरा आनंद घेता येत नाही. अशाच एका निराधार चिमुरड्याची कहाणी सध्या समोर आली आहे. फोटोमध्ये कुत्र्यासोबत निवांत झोपलेल्या चिमुरड्याचे नाव अंकित आहे.
— DPO Muzaffarnagar (@dpomzn) December 15, 2020
अंकितचे वडिल तुरूंगात आहेत आणि त्याची आई त्याला रस्त्यावर सोडून निघून गेली. त्यामुळे मज्जा मस्ती करण्याच्या वयात आता अंकित रस्त्यावर फुगे विकण्याचे काम करतो. याशिवाय चहाच्या दुकानातही त्याला कराव करावं लागतं तेव्हा कुठे पोट भरण्याइतके पैसे मिळतात. रोजचं काम संपल्यानंतर आपल्या फुटपाथवरच्या मित्रांसोबत अंकीत झोपतो. अंकितच्या सोबत राहत असलेल्या कुत्र्याचे नाव डॅनी आहे. डॅनी हा अंकितचा खरा मित्र असून नेहमी त्याच्या सोबत राहतो.
टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्नुसार गेल्या काही वर्षांपासून अंकित याच पद्धतीचे जीवन जगत आहे. चहाच्या दुकान मालकाने सांगितले की, ''दिवसभर काम केल्यानंतर रात्री आपला मित्र डॅनीसोबत जेवून अंकित फुटपाथवरच विश्रांती घेतो. तो कधीही काहीही मोफत घेत नाही. तो आपल्या कुत्र्यासाठी कोणाकडून दूधही मोफत मागत नाही.''
सलाम! पठ्ठ्यानं टिव्हीचा खोका वापरून रस्त्यावरच्या मुक्या जीवांसाठी 'असा' उभारला निवारा
काही दिवसांपूर्वी आपल्या कुत्र्यासह चादर ओढून झोपलल्या लहान मुलाला पाहून एका सोशल मीडिया युजरने फोटो काढला होता. हा फोटो ट्विटरवर येताच तुफान व्हायरल झाला होता. स्थानिक प्रशासनाने या मुलाचा शोध घ्यायला सुरूवात केली. त्यानंतर सोमवारी सकाळपर्यंत पोलिसांनी या कुत्र्याला शोधून काढले. या मुलाला शोधण्यासाठी मुजफ्फरनगरचे एसएसपी अभिषेक यादव यांनी पोलिसांची टीम पाठवली होती. आता हा चिमुरडा पोलिसांच्या देखरेखीखाली आहे.
वाह, नादच खुळा! नवविवाहीत बहिणीला माहेरी आणायला भाऊ थेट हेलिकॉप्टर घेऊन पोहोचला
एसएसपी अभिषेक यादव यांनी सांगितले की, आम्ही अंकितच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये अंकितचे फोटो देण्यात आले आहेत. आम्ही महिला आणि बाल- कल्याण विभागाला अंकितबद्दल माहिती दिली आहे. एसएचओ अनिल कारपान यांनी सांगितले की, अंकित स्थानिक महिला शिलादेवी यांच्या सोबत राहतो. एक खासगी त्याला शाळा मोफत शिक्षण देण्यासाठी तयार झाली आहे.